पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/132

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इ १०० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास इस्लामच्या सैनिकांना मिळतांच त्यांनी आपल्या तलवारी म्यानाबाहेर काढल्या व कैद्यांचा शिरच्छेद केला. त्या दिवशीं एक लाख काफर मूतपूजकांचा वध करण्यांत आला. आमच्यांतील एका विद्वान् मंत्र्याने त्याच्या सबंध आयुष्यात एक चिमणीहि मारली नव्हती, पण त्याने देखील त्या दिवशी आपल्या तलवारीने त्याच्याजवळच्या १५ कैद्यांचा वध केला. । अभ्यास-:-तैमूरची आज्ञा युद्धनीतीस धरून होती काय ? चर्चा करा | ११ । । । । शिकंदर लोदीचा स्वभाव | ['तारीख-इ-दाऊदी' या ग्रंथाच्या लेखकासंबंधी फार थोडी माहिती मिळते. त्याचे नांव अबदुल्ला. या ग्रंथांत सुलतान ‘बहलोल लोदी'पासून लेखकाने सुरुवात करून ते इ. स. १५७५त खानजहानाच्या आज्ञेवरून दाऊदखानाचा शिरच्छेद झाला येथपर्यत हकीकत दिली आहे. इतिहास म्हणजे नुसत्या राजांच्या कारकीर्दी नव्हेत तर ते शास्त्र आहे, त्याने बुद्धीचा विकास होतो व शहाण्यास मार्गदर्शन होते असे याने म्हटले आहे. पण त्याने केलेल्या लेखनांत कालोल्लेख कमी असून ऐकीव दंतकथांचा सुकाळ आहे. एकंदरीत इतिहास या दृष्टीने या ग्रंथाची विश्वसनीयता कमीच. पुढील उतारा त्याच्या लेखनाचा एक नमुना आहे. एलियट डौसन व्हा. ४ पृ. ४३४.] | शिकंदर लोदी हा विख्यात सुलतान आपल्या अंगच्या औदार्य, परामर्ष घेणे व सभ्यता या गुणांबद्दल फार प्रसिद्ध होता. मनाने धार्मिक, दिसण्यांत देखणा, परमेश्वराविषयीं भावनिष्ठ व आपल्या लोकांना परोपकारी असे त्याचे वर्णन करता येईल. तो वृत्तीने न्यायी व धैर्यशाली असून न्यायाच्या कामांत तो दांडगे व दुर्बळ यांच्यांत भेदभाव करीत नसे. पुढे येणा-या पुराव्याचें तो समतोल दृष्टीने परीक्षण करी आणि मगच खटल्याचा निकाल देई. प्रजेस सुखी करण्याचा त्याचा सतत प्रयत्न चालू असे. तो रात्रभर जागा राहून गरिबांचीं गान्हाणी ऐके, राज्यकारभाराची व्यवस्था करी,. फर्मान काढणे किंवा पत्रे लिहिणे ही कामेंहि करी. त्याच्याबरोबर सतरा विद्वान् आणि सभ्य पुरुष नेहमीं असत. मध्य१६]