पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/14

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ ३७ ४७ २१ ६ ( ७ ) असो, अशा पांच प्रकारच्या इतिहास–साधनांचा या छोटेखानी साधन ग्रंथांत विस्तार केला आहे. यांत हिंदुस्थानच्या इतिहासास साधनीभूत असणा-या निरनिराळ्या १२३ ग्रंथांतून (यादी सोबत) २०४ उतारे घेतले आहेत. त्याची वाटणी पुढीलप्रमाणे-- काल ग्रंथसंख्या उतारे प्राचीन काल - ३० मुसलमानी अंमल मराठी अंमल ४९ ब्रिटिश अंमल | स्वातंत्र्यकाल हे उतारे निवडतांना पुढील दृष्टि ठेवली आहे :-- शक्यतों समकालीन ग्रंथ वा लेखकांच्या लिखाणांतून उतारे संग्रहित केले आहेत. असे करतांना राजकीय माहिती देणा-या उताच्याप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक घटनांची माहिती सांगणारे उतारे मुद्दाम दिले आहेत. एकाच मुद्यासंबंधी भिन्न लेखकांचे दृष्टिकोन कसे असतात ते कळावे व त्यांतील सत्य पारखण्यास कसे शिकावे हे ध्यानीं यावे म्हणून शिवजन्मतिथि, ( उतारा क्रमांक ८ ), किंवा शहाजहानचा वैभवशाली काल ( उतारे ३३, ३४, ३५ ) अथवा ‘धर्मजिज्ञासू अकबर' या शीर्षकाखाली भिन्नमताचे उतारे एकत्रित दिले आहेत. | दर उता-याच्या प्रारंभी त्या ग्रंथाचा किंवा ग्रंथाकाराचा परिचय दिला आहे. असे करतांना केव्हां केव्हां मिया मूठभर व दाढी हातभर असा प्रकार झाला आहे. आपल्या विद्याथ्र्यांना, सहकारी शिक्षकांना व वाचकांना या ग्रंथकाराचा परिचय आवश्यक आहे असे वाटून तो येथे दिला आहे. जिज्ञासूंनीं मूळ ग्रंथ पहावे व अधिक उतारे वाचावे हीहि इच्छा आहे. मळ उता-याचे भाषांतर करतांना अगदी शब्दशः भाषांतर कोठे केले व कोठे करू लागलों ते अगदी अवाच्य होऊ लागले, तेव्हां मूळांतील अर्थ मराटींत आणला. मूळ उतारा कधी कधीं मूळ ग्रंथांतून तर कधी कधी दुय्यम साधन ग्रंथांतून घेतला आहे. पण प्रत्येक ठिकाणी आम्हीं तो जेथून निवडला