पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/145

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुराजगडचे युद्ध ११३ १९ । । । । सुराजगडचे युद्ध एक प्रहर रात्र उरली असतां शेरखानाने खंदकांतून ( entrenchment ) सैनिकांना बाहेर आणून सेना सिद्ध केली. पहाटेची प्रार्थना झाल्यावर तो स्वतः बाहेर आला आणि सरदारांना म्हणाला, “शत्रूच्या सैन्यांत पुष्कळ हत्ती, तोफा आणि खूप पायदळ आहे. त्याच्याशी आपण अशा रीतीने युद्ध केले पाहिजे की, त्यांना मूळची व्यवस्था ठेवणे अशक्य व्हावे. पायदळ आणि तोफांपासून बंगालच्या घोडदळाला दूर नेले पाहिजे, आणि घोडे नि हत्ती यांची अशी गल्लत केली पाहिजे की, त्यांच्या व्यवस्थेत विस्कळितपणा उत्पन्न व्हावा. बंगाल्यांचा पराभव करण्याची मी एक योजना तयार केली आहे. आगास दिसतो त्या उंचवट्यापलीकडे माझ्या सैन्याचा पुष्कळसा भाग मी नेईन आणि हल्ला करण्यासाठीं कांहीं अनुभवी नि कुशल घोडेस्वारांना ठेवीन. आतां ते अगदी पूर्वीच्या पद्धतीने व पराभव होणार नाही अशा विश्वासाने लढतील. मी माझी निवडक सेना त्यांच्यावर नेईन. बाणांची एक फैर झाडली की, ती परतू लागेल. खूप सैन्य आहे तेव्हां जय मिळणारच या भरंवशावर शत्रु राहील. त्याला वाटेल की अफगाण पळू लागले, आणि अधीरतेने पायदळ आणि तोफा यांना तेथेच टाकून शक्य त्या शीघ्रतेने शत्रु (आमच्या मागे ) लागेल. (साहजिकच) युद्धाच्या ठरलेल्या योजनेत अव्यवस्था नि गोंधळ निर्माण होईल. मग उंचवट्यापली. कडे लपविलेल्या माझ्या सेनेला मी पुढे आणीन आणि ती शत्रूवर हल्ला करील. पायदळ नि तोफा यांचा आधार नाहीसा झाल्यावर बंगाली घोडदळ अफगाणी घोडदळाला तोंड देऊ शकणार नाही. मला आशा वाटते की, ईश्वरी कृपेने त्यांच्या सैन्याची धूळधाण होईल व त्यांस पळ काढावा लागेल. [ संदर्भ :--शेरशाहाच्या अपेक्षेप्रमाणे घडून आले, त्याचा मोठा विजय झाला. या वेळी बंगालचा सुलतान महमूद नांवाचा होता. ही लढाई शेरशाहाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना होय. इ. स. १५३३.] अभ्यास :--'राज्यकर्ता व सेनापति होण्यास शेरशाह सर्वथैव योग्य होता, हे विधान वरील उता-यांच्या मदतीने सिद्ध करा. कांहीं मुद्दे : सारा आकारणी नि वसुलीचे धोरण; सैन्याचे कर्तव्य; युद्धांतील हिकमती. [ २९