पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/156

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास कीर्द यांनी व्यापली आहे. बाकीच्या सुमारे १३५ पृष्ठांत त्याने पूर्वीचा इतिहास आवरला आहे. याच्या ग्रंथाचे नांव ‘मुनाखबुत तबारीक' यास तवारीख-इ-बदाउनी असेहि म्हणतात. याचे मूळ नांव अबदुल कादर, तो बदाउन गांवचा म्हणून बदाउनी हें नांव त्यास पडले. याने महाभारताच्या १८ पर्वांपैकी दोन पर्वाचे व रामायणांतील कांहीं भागांचे भाषांतर केले आहे. अकबराच्या कारकीर्दीत फैजीच्या हाताखालीं एक बड़े विद्याखातेच होते. तेथे हा काम करी, पण तो फजल-फैजीबंधूचा द्वेष्टा होता. कारण त्याच्या मते ते कट्टरपणे मुसलमानी धर्मावर विश्वास ठेवीत नसत. बदाउनीच्या लेखनांत ठिकठिकाणीं अकबरावर कठोर टीका असली तरी अकबराच्या पदरच्या दरबारी लेखकांच्या भोंगळ स्तुतीपेक्षां या टीकापर लेखनापासूनच अकबर अधिक यथार्थतेने समजून येतो. इ. व डौ. व्हॉ. ५ पृ. ४७७ व ५२७-५३१.] हिजरी ९८३ मध्ये (इ. स. १६७४) इबादतखान्याचे काम पूर्ण झालें. तो बांधला जाण्याचे कारण असे :--अलीकडच्या काळांत बादशाहाला पुष्कळ विजय मिळाले ; त्याला कोणी शत्रूहि उरला नाही. साधु , लोकांच्या संगतीची त्याला आवड उत्पन्न झाली होतीच. पैगंबराचे सांगणे आणि कुराण याविषयीं तो चर्चा करी; तसेच सूफी सिद्धांत, शास्त्र आणि तत्त्वज्ञान यांच्या चर्चेतहि तो आस्थापूर्वक भाग घेई. रात्रीच्या रात्री तो परमेश्वर व त्यास आळविण्याचे मार्ग यासंबंधीच्या चिंतनांत घालवी. सृष्टिकर्याबद्दलच्या आदराने त्याचे हृदय भरून येई, आणि कृतज्ञतापूर्वक कित्येक दिवशी सकाळच्या वेळेस राजवाड्याजवळील एकान्त भागीं एका शिळेवर (बसून) तो ईश्वराची करुणा भाकी. उषःकालच्या या प्रार्थनेने तो आशीर्वाद मिळवी. ....... जमलेले विद्वान् लोक आपल्या जिव्हारूपी तलवारींनी एकमेकांस एकदम छाटून टाकीत, आणि आपल्या व्यतिरिक्त इतर पंथीयांना ' काफर' आणि 'चुकीच्या मार्गानीं चाललेले' असे म्हणत. कांहीतरी नावीन्य पाहिजे अशा बुद्धीनें कांहीं जण मोठ्या कौशल्याने शंका कुशंका काढीत. यामुळे जे चुकीचे ते बरोबर आणि जे बरोबर ते चुकीचे असे भासवीत. सत्याच्या शोधास निघालेल्या राजाला चांगली धारणाशक्ति होती. पण त्यांच्या भोंवतीं अधामिक नि हलक्या प्रवृत्तीचे लोक जमले होते. शंकावर शंका निघत. शेवटी त्याचा सत्य शोधाचा हेतु विफल ४०]