पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/163

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जहांगीरच्या आज्ञा । १३१ (७) कोणाचेंहि नाक किंवा कान कापले जाणार नाहीत. ईश्वराच्या सिंहासनापाशीं मीं अशी प्रतिज्ञा केली आहे कीं, अशा रीतीने मी कोणालाहि छिन्नविच्छिन्न करणार नाहीं. (८) सरकारी अधिकारी किंवा जहागीरदार यांनी जबरदस्तीने रयतेच्या जमिनी घेऊ नयेत, त्यांत स्वतःसाठी पिके काढू नयेत. (९) सरकारी अधिकारी किंवा जहागीरदार यांनी पूर्व परवानगीशिवाय आपल्या परगण्यांतील रहिवाशांबरोबर आंतरजातीय विवाह करू नये. (१०) मोठ्या शहरांतून सरकारी खर्चाने इस्पितळे स्थापन करण्यांत येतील आणि तेथे वैद्यांच्या नेमणुका करण्यांत येतील. (११) माझ्या पूज्य पित्याच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक वर्षी माझ्या जन्मदिवसापासून माझ्या वयाच्या दुप्पट दिवसापर्यंत माझ्या राज्यारोहणाच्या दिवशीं ( प्रत्येक गुरुवारी ) किंवा माझ्या पित्याच्या जन्मदिवशीं ( प्रत्येक रविवारी ) प्राण्यांची हत्या करू नये. रविवार हा सूर्याचा दिवस असल्यामुळे आणि सृष्टीचा प्रथम दिन असल्यामुळे माझे वडील तो पूज्य मानीत. (१२) माझ्या वडिलांनी नेमलेले अधिकारी आणि जहागीरदार यांना मी त्यांच्या आपापल्या जागी कायम करीत आहे.•••याखेरीज या एकटाकी हुकुमाने मी माझ्या वडिलांच्या जनानखान्यांतील गोषांतील स्त्रियांच्या नेमणकींत २० ते १०० टक्के वाढ केली आहे. तसेच दानपत्राने मिळालेली दाने त्या त्या आश्रितांस कायम करीत आहे. तसेच तुरुंगांत व किल्ल्यांत बंदिवासांत राहिलेल्या सर्व गुन्हेगारांस, मीं मुक्त केले आहे. अभ्यास :--१. जहांगीरने स्वतःसंबंधी सांगितलेली माहिती कोणती ? २. सामान्य जनतेला कोणते नियम लाभकारी आहेत ? ३. ' राज्यकारभाराची जहांगीरची तात्त्विक दृष्टि' या विषयावर एक परिच्छेद लिहा.


ता... । 5 | | . ਵੇ ਨੂੰ 1 38 , ਜਾਣ

ਨਜਰ ਆ ॥ IF IT ਤੇ ਹਨ ਤੇ .. ९ सा.इ. ४७