पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/164

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ हिंदुस्थानची साधनरूप इतिहास ३२ ।।।। शहाजहानची दिनचर्या [ औरंगजेबाच्या पत्राचे मुख्यतः तीन संग्रह प्रसिद्ध आहेत. पहिला • त्याच्या मुख्य चिटणिसांपैकीं इनायतुल्ला याचा, दुसरा अब्दुल करीम नांवाच्या त्याच्या चिटणिसाच्या मुलाचा व तिसरा राजा अयामलच्या आश्रित विद्वानांचा. । या संग्रहांतील पत्रांना तारखा किंवा विशेषक्रम दिलेला नाहीं. परंतु बहुतेक पत्रे औरंगजेबाच्या उत्तर आयुष्यांतील व दक्षिणेतील लढायांत ( इ. स. १६८३-१७०७ ) तो गुंतलेला असतानाचीं आहेत. या पत्रांतून औरंगजेबाची धार्मिक वृत्ति, खासगी जीवनांतील साधेपणा इ. गोष्टी त्यांत व्यक्त झालेल्या आहेत. प्रसंगोपात् त्याने आपल्या मुलांना राजधर्माचे धडेहि दिलेले आहेत. असेच एक पत्र पुढे दिले आहे. | या अनेक ठिकाणच्या पत्रांच्या इंग्रजी अनुवादाचा संग्रह Letters of Aurangzeb' या नांवाने श्री. जे. एच. बिलिमोरिया यांनी केला व लंडनच्या Luzac & Co. ने तो प्रकाशित केला. त्या पुस्तकाच्या पृ. १४ वरील १२ वें पत्र येथ अनुवादित केले आहे. ] [ औरंगजेबाचे पुत्र महंमद आझमशाह बहादूर यास पत्र ] भाग्यशील पुत्रा, अलाहजरत* (शहाजहान) म्हणत कीं, शिकार करणे हा रिकामटेकडया लोकांचा उद्योग आहे; अशा रीतीने ऐहिक विलासांत दंग असावे व धर्माचरणाचे विस्मरण पडावे हे युक्त नव्हे; कारण इहलोकच्या कृत्यांवरून मनुष्याचे स्वर्लोकांतील स्थान निश्चित होते. अलाहजरतविषयीं असे सांगतात की, ते स्वतः पहाटे चार वाजतां मोठया उत्साहाने उठत. नंतर मुखमार्जन झाल्यावर ते एकटेच ईशचितन करीत व त्यानंतर सूर्योदयापूर्वीच मशिदींतून सामुदायिक प्रार्थनेची ललकारी आल्याबरोबर विद्वज्जनांसमवेत पुनः प्रार्थनागीत ते गात. हा धार्मिक विधि आटोपल्यावर झरोक्यांत जाऊन लोकांना दर्शन देत. दहा वाजण्याच्या समारास अलाहजरत दिवाण-इ-आममध्ये (सार्वजनिक काम करण्यासाठी) जात. या सभेत त्यांचे अधिकारी त्यांना लवून सलाम करीत; प्रधान व खजिनदार हे आपल्या

  • शहाजहानच्या मृत्यूनंतर औरंगजेब त्याचा उल्लेख अलाजरत नांवाने करीत असे.

५० ]