पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/166

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६. हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ३३ ।।।। शहाजहानाची दक्षता | [ हा उतारा लुब-अत-तवारीख (इतिहासाचे सार) या ग्रंथांतून घेतला आहे. ग्रंथाचा लेखक रायबहादुरमल यानें तो इ. स. १६९६च्या सुमारास लिहिला असावा. याचा बाप दाराशुकोच्या पदरीं दिवाण होता. याने गज्नीच्या सुलतान महमुदापासून ते इ. स. १६९०पर्यंतचा इतिहास लिहिला. फिरिस्ताच्या ग्रंथांत सतराव्या शतकाचा इतिहास नाहीं व ठिकठिकाणीं तो फारच पाल्हाळिक आहे म्हणून व तैमूर घराण्याचा पराक्रम वर्णन करून सांगावा म्हणून आपण इतिहासलेखनास प्रवृत्त झाल्याचे तो सांगतो. तो म्हणतो “मोगल साम्राज्यास उपमा एक रोमची; पण रोमबद्दल आपण नुसते ऐकतों. मोगलाबद्दल आपण प्रत्यक्ष : पाहात आहों." एकूण मोगलांच्या पराक्रमाची चहा करणा-याने हें। लेखन केले आहे. इ. व डौ. व्हॉ. ७, पृ. १६८ पाहा. ] - एकंदर साम्राज्याच्या भरभराटीला पुढील गोष्टी कारणीभूत झाल्या. लोकांच्या पोषणसंरक्षणासाठी या सुखी काळांत राजाने मुद्दाम योजलेले उपाय, लोकांचे कल्याण कशाने होईल याची जाणीव, प्रामाणिक आणि बुद्धिमान् लोकांकडून त्याने केलेली राज्यव्यवस्था, हिशेबाची व्यवस्था, बादशाहाच्या खाजगी जमिनी आणि त्यावरील खंडकरी यांची त्याने घेतलेली काळजी, शेतीला त्याने दिलेले उत्तेजन, सरकारी सारा गोळा करण्याची त्याची व्यवस्था, चुका व जुलूम करणारांना शिक्षा करणे आणि धाक दाखविणे. अकबराच्या वेळीं ज्या परगण्याचा सारा तीन लाख येई तेथे आतां दहा लाख येऊ लागला, कांहीं कांहीं ठिकाणीं किंचित् फरक पडला. ज्यांनी काळजीपूर्वक शेती करून सरकारी उत्पन्न वाढविलें त्यांना बक्षीस दिले जाई; आणि याप्रमाणे न वागणारांना शिक्षा केली जाई. या कारकीर्दीच्या मानाने पूर्वीच्या कारकीर्दीतील खर्च एकचतुर्थाशहि नव्हताः असे असूनहि इतर राजांच्या कारकीर्दीत जमा होण्यास अनेक वर्षे लागली असतीं , इतका खजिना या राजाने सांठविला. १, १२, - । । । ५२]