पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/169

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बंगालमधील ख्रिस्ती वस्ती १३९ ३५ ।। बंगालमधील ख्रिस्ती वस्ती 1 [बनिअरचे प्रवासवृत्त पृ. ४३८] । बंगालमध्ये जीवनास लागणाच्या सर्व गोष्टी विपुल आहेत. यामुळेच कित्येक अर्धवट पोर्तुगीज ( हाफ कास्ट ) व इतर ख्रिश्चन हे डच वसाहतींतून हाकलले गेल्यावर आश्रयार्थ याच सुपीक राज्यांत आले. जेसुईट आणि ऑगस्टाइन यांची येथे मोठमोठी देवळे (चर्च) असून त्यांना आपल्या धर्माप्रमाणे वागण्याची मुभा आहे. त्यांच्यापैकीं कांहींनी मला असे सांगितलें कीं, एकट्या हुगळीमध्येच ८ ते ९ हजार ख्रिस्ती असून राज्यांतील इतर भागांतहि त्यांची संख्या पंचवीस हजारांवर असावी. प्रदेशांतील सुबत्ता, स्थानिक स्त्रियांचे सौंदर्य आणि सुस्वभाव यामुळे पोर्तुगीज, इंग्रज आणि डच यांच्यामध्ये एक म्हणच पडली आहे कीं, बंगालच्या राज्यांत येण्यास शेकडों प्रवेशद्वारे खुलीं आहेत; पण परत जाण्याला मात्र एकहि नाहीं. प्रश्न :--खिस्ती लोकांनी या देशांत कां वस्ती केली ? त्यांना बंगाल सोडू नये असे कां वाटत होते ? .


।। । ३६।।

लढण्याची दिखाऊ पडत [ निकोलो मनूची या इटालियन प्रवाशाची अद्भुतरम्य जीवनकथा व त्याने लिहिलेली तितकीच रम्य ' मोगल कथा' ही हिंदुस्थानचा सतराव्या शतकांतील इतिहास समजण्यास अत्यंत उपयोगी आहे. मनूचीच्या लेखनाचे चार जबरदस्त खंड आहेत. हा जन्माने के इटालियन, पण याने मूळ ग्रंथ पोर्तुगीज व थोडासा फ्रेंच व इटालियन भाषांत लिहिला; त्याचे समग्र इंग्रजी भाषांतर इ. स. १९०७ मध्ये प्रसिद्ध झाले. मनूचीचा जन्म इ. स. १६३९ च्या सुमाराचा. जन्मस्थान बहुधा व्हेनिस में शहर असावे. लहानपणी जग पाहण्याची आवड म्हणून वयाच्या चवदाव्या वर्षी हा वडिलांचा डोळा चुकवून बंदरावर किना-याला लागलेल्या बोटींत शिरला. बोटीवरील प्रत्येकास वाटले की, हा कुणाचा तरी बरोबर आलेला मुलगा असेल. बोट चालू लागली. अशा रीतीने हा इ. स. १६५६ च्या जानेवारींत [ ५५