पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/171

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

औरंगजेबाच्या राज्यांतील अव्यवस्था १४१ ३७।। औरंगजेबाच्या राज्यांतील अव्यवस्था [ राजपुत्र अकबराचे पत्र : प्रा. शर्माकृत क्रेसंट इन् इंडिया पृ.५९६.] आपल्या राज्यकारभारांत प्रधानांना अधिकार नाहीं. सरदारांवर विश्वास नाहीं, सैनिकांच्या नशिबी दारिद्रय, लेखक रिकामटेकडे, व्यापारी साधनेंहीन आणि कृषिवर्ग पददलित झाला आहे. त्याचप्रमाणे दक्षिणचे राज्य खरोखरच पृथ्वीवरील नंदनवन आहे तेहि आतां ओसाड आणि नष्ट भ्रष्ट झालें आहे; ब-हाणपुर में शहर सृष्टिसुंदरीच्या गालावरील तीळाप्रमाणे शोभिवंत दिसत असे; ते आतां उध्वस्त झालेले आहे. आपल्या नांवाशीं संबद्ध असलेले औरंगाबाद में शहर शत्रूच्या हल्ल्यामुळे आणि धाकाने जिकिरीस आले आहे. हिंदू जातीवर दोन संकट कोसळली आहेत. शहरांतून जिझीया कराची आकारणी में एक आणि दुसरे खेड्यांतून शत्रूचा जुलूम. सर्व बाजूनी लोकांवर अशा आपत्ति आल्या असतां ते आपल्या राज्यकर्त्यांबद्दल (परमेश्वरापाशीं) प्रार्थना कां करतील ? आणि त्यांना धन्यवाद तरी काय म्हणून देतील ? पूर्वीच्या शुद्ध आणि उच्च घराण्यांतील कारभारी मागे पडून तुमच्या सरकारचा कारभार आणि तुम्हांला राजनैतिक सल्ला देण्याचे काम में आतां हलक्या दर्जाचे लुच्चे विणकरी वा शिंपी व साबणविके यांच्या हाती आलेले आहे. ही माणसे कपटहेतूनें कांहीं धार्मिक आणि पारंपरिक सूत्रे बडबडत असतात. आपण मात्र जणु काय ते लोक व शिपाई देवदूत आहेत असे समजून त्यांच्यावर विश्वस ठेवतां, आणि त्यांच्या हातांतील बाहुले बनतां ! अशा स्थितींत हीं माणसे गहू दाखवून बारली विकतात. अशा रीतीने गवताच्या काडीच्या जागी टेकडी व टेकडीच्या जागी गवताची काडी आहे असे तुम्हांला भासवतील यांत नवल ते काय ? अभ्यास :--औरंगजेबाच्या कारभारांतील दोष कोणते ते मुद्देसूद लिहा. (१) जनतेची स्थिति, (२) हिंदूंवरील संकट, (३) राजांच्या सल्लागारांची योग्यता. [ ५७