पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/174

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास झाला. त्यांना पकडून दिल्लीस आणण्यांत आले. मुलास मारण्याचा हा कट आहे हे ओळखून जोधपूरचा अभिमानी दुर्गादास याच्या युक्तीने ती मुलें बादशाहाच्या तावडीतून सुटलीं तें वृत्त पुढे दिले आहे.] राजा जसवंतसिंगच्या खंडणी ( Tribute )बद्दलचे दुःख औरंगजेबाच्या मनांत फार दिवस डांचत होते, त्यांतच त्याच्या मृत्यूनंतरच्या या पुत्रजन्माच्या व इतर घडामोडीमुळे भर पडली. बादशाहानें कोतवालाला आज्ञा केली की, मनसबदाराकडील सैन्य, कांहीं तोफा आणि स्वतःची फौज घेऊन या राजपुताभोंवतीं पहारा ठेवा. या अवघींत राजपुत्रांच्या वयाची दोन मुलें राजपुतांनी मिळविली. दासींपैकीं कांहींना राण्यांचा पोषाख घालण्यास दिला. आपली युक्ति कोणाच्याहि लक्षात येऊ नये याची काळजी घेऊन या राण्यांच्या ताब्यांत मुलांना दिले व त्यांच्यावर आपला पहारा ठेवला. ख-या राण्यांनी पुरुषांचा वेष घेतला, आणि दोन विश्वासू नोकर नि देशभक्त राजपुतांच्या एका टोळीसह रात्रीच्या वेळेला त्या तळावरून निसटल्या नि शक्य त्या वेगाने स्वदेशाकडे मार्गस्थ झाल्या. त्यांना अडवू शकतील किंवा त्यांचा पाठलाग करतील असे अधिकारी तोतया राजपुत्रांच्या तंबूभोंवतीं पहारे करीत होते. दोन तीन पहारे बदलल्यानंतर ही बातमी सांगण्यांत आली, तेव्हां कांहीं अधिकारी चौकशीसाठी पाठविण्यात आले. त्यांनी पुनः पुनः वार्ता आणली कीं, राण्या आणि मुलें। तंबूतच आहेत. शेवटीं राजाच्या सर्व लवाजम्याला किल्ल्यांत बंदींत ठेवण्याची आज्ञा झाली; तेव्हा मात्र राजाच्या सन्मानासाठीं वीर पुरुषांसारखे लढण्यास सिद्ध असलेले ते राजपूत आणि राणीवेषधारी स्त्रिया यांनी चांगलाच प्रतिकार केला. पुष्कळांचा वध झाला पण (राजपुतांची) जी टोळी निसटली ती निसटलीच ! अभ्यास :--१. “राजपुतांचे अप्रतिम शौर्य आणि धडाडीबरोबरच मोगलांचे संघटनकौशल्य, युक्ति आणि मुत्सद्दीपणा हे गुण दुर्गादासांत एकवटलेले आढळतात. वरील वृत्तावरून या सिद्धांतास कितपत पुष्टि मिळते ? २. दुर्गादास राठोडची अधिक माहिती मिळवा. _____ ६०1।। ।।