पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/175

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| औरंगजेबाकडून आपल्या शिक्षकाची कानउघाडणी । १४५ ४० औरंगजेबाकडून आपल्या शिक्षकाची कानउघाडणी ['के' कृत एशन्ट इंडियन एज्युकेशन पृ. १३४ वरून ] : मोगल अमदानींतील शिक्षणाच्या पद्धतीबद्दल थोडीशी कल्पना औरंगजेब व त्याचा शिक्षक यांच्यात झालेल्या भाषणावरून येईल. औरंगजेबाच्या राज्यारोहणानंतर त्याचा एक जुना शिक्षक मोठ्या आशेने त्यास भेटण्यास गेला. अगोदर तीन महिने बादशाहाने त्याची गांठच घेतली नाहीं. अखेर भेट झाल्यावर बादशाह म्हणाला, “ मुल्लाजी, माझ्याशी तुमचे काय काम आहे ? तुम्हांला असे वाटते का की, मी तुमच्यासाठी मोठी पगाराची जागा राखून ठेवावी? तुम्ही मला जर योग्य शिक्षण दिले असते तर खरोखरच मी तुमचा सन्मान करणे जरूरीचे होते......पण तुम्ही मला काय शिकविलें ? युरोप (फिरंगिस्तान) म्हणजे एक लहानसे बेट आहे. तेथील सत्ताधीश इकडल्या क्षुद्र राजांहूनहि अधिक मोठे नाहीत असे तुम्हीं सांगितलेत ! त्या सर्वांपेक्षां हुमायून, अकबर, जहांगीर हेच सर्वश्रेष्ठ होत, त्यांचे नांव ऐकून काश्गर, तार्तरी, इराण, सयाम, चीन येथील राजे म्हणे थरथर कांपतात ! अहो तज्ज्ञ इतिहासकार व अजब भूगोलज्ञ, जगांतील प्रत्येक राष्ट्राची स्वाभाविक रचना, संपत्ति, धर्म, राज्यशासनाचे प्रकार हे तरी मला शिकविण्याचे तुमचे काम नव्हते काय ? या देशाच्या आसपासच्या प्रदेशांतील भाषा राजास यावयास नको काय ? पण तुम्ही तपेंच्या तपे शिकावयास लागणारी अरबी भाषा तेवढी माझ्या माथी मारण्याचा उपकार केलात ! राजपुत्राला कोणता विषय किती महत्त्वाचा आहे हे न ओळखतां अरबी व्याकरणाची घोकंपट्टी तुम्ही मला करावयास लावली....आपल्या मातृभाषेतून देवाची प्रार्थना केली तर ती त्याला ऐकू जात नाहीं काय ? तसेच बौद्धिक कवाईत देणारे तत्त्वज्ञान तुम्ही मला शिकवलें व माझे कित्येक तास त्यांत वांया घालविले ! या उत्पत्तिविलयाच्या शब्दजंजाळापेक्षां तुम्ही जर मला विवेचक बुद्धि, आत्म्याला उन्नत करणारा व सुखदुःखांत मनाची शांति टिकवणारा मार्ग दाखविला असतां तर, अलेक्झांडरला जितका ऑरिस्टॉटलबद्दल आदर वाटला असेल, त्यापेक्षांहि अधिक आदर तुमच्याबद्दल मला वाटला असता ! अरे खुषमस्कच्या (Sycophant) बोल, कांहीं [६१