पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/178

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास मोगल बादशाहीचे शेवटचे क्षण | [औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याची सत्ता संपुष्टांत कशी आली याची कल्पना येण्यासाठी उतारे क्र. ४३, ४४, ४५, ४६, ४७ दिले आहेत. शेवटच्या पत्रावरून मराठ्यांनी मोगलांना कसें नामधारी केले होते तेहि समजून येते. ] ४३ : बादशाह फरुकुसियरला जनानखान्यांत पकडले [ सय्यद गुलाम हुसेन खान हा बंगालच्या नबाबाच्या नोकरीमध्ये होता. त्याचे इंग्रजांबरोबर चांगले संधान होते म्हणून नवाबाच्या नोकरींतून त्यांस काढून टाकण्यात आले. पुढे इंग्रजांनी त्यास आपल्याकडे कामास घेतलें. कर्नल गॉडर्डची त्याच्यावर विशेष कृपा होती. शेवटच्या मोगल बादशाहाच्या वृत्तांतासाठी त्याने लिहिलेला * सियर-उल-मुताख़रीन् ' ( आधुनिक काळाचे समालोचन ) हा ग्रंथ उपयुक्त मानतात. हा इ. स. १७८० त लिहिला गेला. ब्रिग्जनें त्या ग्रंथाचे चार भागांत भाषांतर केले आहे. त्यांतून पुढील दोन उतारे घेतले आहेत. प्रस्तुत उतारा भाग १ ला, पृ. १३५ वरून ] बादशाह फरुसियर हा जनानखान्यांत जाऊन बसला. वझीर अणि अजितसिंग बाहेर वाट पहात बसले. हेतु हा कीं, तो काय म्हणतो ते ऐकावे आणि त्याला पकडण्याची संधि मिळवावी. इतक्यांत नुकतीच थांबलेला (बाहेरची) गडबड पुन्हा जोराने सुरू झाली. लूट, हाणमार व खून यांना पुन्हा जोर चढला. फरुकसियर बाहेर आला नाहों...... (इतक्यांत) अफगाण सैनिकांच्या टोळीनें--यांत वझीराचे कांहीं गुलामहि होते-निजामुद्दीन अलिखानच्या घराच्या छपरावरून बादशाहाच्या जनानखान्यांतील अंगणांत उतरण्याचा मार्ग शोधून काढला. या ठिकाणीं हबशी, जॉजियन आणि कालमुक बायांचा पहारा त्यांना आढळला. त्यांची हकालपट्टी करून पठाण आंत शिरले आणि फरुसियरला शोधू लागले. शेवटी त्यांनी केलेला छळ सहन न होऊन कांहीं बायकांनी जेथे राजा लपलेला होता ती जागा ६४]