पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/180

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास आपल्या जन्मभूमीत बरहा येथे लोकोपयोगासाठीं धर्मशाळा, सराया, पूल आणि अन्य इमारती बांधल्या. सय्यद अब्दुल्लाचे वैशिष्ट्य म्हणजे शांतवृत्ति, धैर्य आणि सहानुभूति हे होत. ४५ : दिल्ली दरबारात निजामाची अप्रतिष्ठा | [कथा संदर्भ :--सय्यद बंधूच्या मृत्यूनंतर निजामाने दक्षिणेत स्वाच्या करण्यास व स्वतंत्र स्थान मिळविण्यास प्रारंभ केला होता; परंतु त्यासच बादशाहाने वजिरी देण्याचे ठरविल्याने तो दिल्लीस परत गेला. तेथे २० फेब्रुवारी १७२२ मध्ये तो मुख्य प्रधान झाला. तेथील वातावरणास कंटाळून, कांहीतरी सबबी काढून तो ११ नोव्हेंबर १७२२ला दक्षिणेत जाण्यास निघाला. ऑगस्ट १७२४ मध्ये तो औरंगावाद येथे येऊन पोहोचला. जवळजवळ स्वतंत्रपणेच तो इकडील सुभ्यांचा कारभार पाहू लागला. तो दिल्लोस होता त्या वेळच्या त्याच्या स्थितीचे पुढील वर्णन गुलाम हुसेनने केले आहे. प्रा. शर्माकृत क्रेसंट इन इंडिया पृ. ६३६ वरून.] निजाम-उल-मुल्क हा गंभीर प्रकृतीचा, आपल्याच कामांत गक असणारा (Reserve ) आणि सत्तालोलुप होता. त्याने राज्यकारभाराच्या कांहीं महत्त्वाच्या शाखांत सुधारणा करण्यास आरंभ केला. बादशाहाला त्याने सुचविलें कीं, सार्वजनिक प्रसंगी त्याने गांभीर्याने आणि जाणीवेने वागावे, सर्व प्रकारचे चांचल्य टाकावे, प्रसंगास शोभेसे वर्तन ठेवावें, नोकरांना मर्यादेने राहण्यास आज्ञापावे, प्रत्येक खात्यास ठराविक वेळ देऊन तो कारभार पहावा. स्वतः न्याय देण्याची वेळ निश्चित करावी, एका शब्दांत थोर बादशाहास साजेशी कर्तव्ये त्या स्थानाच्या योग्यतेनुरूप त्याने पार पाडावीं. हा सर्व उपदेश बादशाहाने ऐकला पण त्याला तो आवडला नाही. राजा हा ऐन तारुण्याच्या भरात आणि साम्राज्याच्या वैभवाने आलेल्या गुर्मीत होता. त्याचा स्वभाव अगदीच सुखलोलुप होता. त्याच्या प्रमुख सरदारांनाहि (निजामाचा) हा सल्ला त्याच्यापेक्षा कांहीं अधिक रुचला नाही. निजाम-उल्-मुल्कसारख्यांनी दरबारांत पुढाकार ६६]