पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/181

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नादीरशाहाची दिल्लीवर स्वारी १५१ घ्यावा ही गोष्ट खान दौरानला तर मुळींच सहन झाली नाही. त्यामुळे वजिरावर एकंदरींत (दरबारांत ) वक्रदृष्टि असे आणि त्याच्याविषयी उपहासाचे उद्गार निघत. . 'निजामाचे वय आतां पन्नासाचे पुढे गेले होते. त्याची वागणूक जुन्या पद्धतीची (अर्थात् टाकाऊ) आहे' असे तरुण बादशाह आणि त्याचे जिगरदोस्त उपहासाने म्हणत. या काळांतील पुढील कथा प्रसिद्ध आहे. निजामाच्या पोषाखास आणि रुबाबास पाहून भर दरबारांत महंमदशाहा (उपहासाने) हंसला आणि शम्सुद्दौला (त्यांस) म्हणाला कीं ‘‘पहा दख्खनचे माकड कसे नाचते आहे ?" ४६ : : नादीरशाहाची दिल्लीवर स्वारी | [ आनंद रंगा पिले यास मनुष्यस्वभावाची आणि वस्तुस्थितीची चांगली परीक्षा होती. त्यामुळे हलक्या कामापासून वाढत वाढत तो डुप्लेचा (पाँडिचरीचा फ्रेंच गव्हर्नर) दुभाष्या झाला. गव्हर्नरच्या पत्नीचा त्याच्यावर रोष असला तरी डुप्लेचा सूत्रधार तोच बनला होता. तो आपली डायरी लिहीत असे, ती आतां उपलब्ध झाली आहे. तिचे एकंदर १२ भाग आहेत. त्यामध्ये इ. स. १७३६ ते १७६१ या कालांतील राजकीय, सामाजिक, व्यापारी व लष्करी घडामोडींचा वृत्तांत दिलेला असल्याने अस्सल ऐतिहासिक साधन म्हणून तिला फार महत्त्व आहे. या पंचवीस वर्षांच्या काळांत डायरीलेखनांत मधून मधून थोडे खंड पडले आहेत त्याची पहिल्या भागाच्या प्रास्ता'विकांत पृ. १६-१७ वर माहिती दिली आहे. 'प्राईस डॉडवेल' आणि रंगाचारी यांनीं ' प्रायव्हेट डायरी ऑफ आनंद रंगा पिले 'चे संपादन केले आहे. प्रस्तुत उतारा भाग १ ला, पृ. ९३ वरून.]

  • शनिवार २३ मे १७३९''''सुरतेकडून आज दुपारी जहाज आले त्याबरोबर पुढील वार्ता आली. इराणचा शहा तहामस्प कुली
  • ११ मार्च १७३९ ला दिल्लीत कत्तल झाली. ५ मे १७३९ ला नादीरशाहा दिल्ली सोडून परत गेला.

[ ६७