पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/186

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ३ रा मराठी अंमल १ :: सातव्या शतकांतील महाराष्ट्राचा उल्लेख [ पुढील उतारा चालुक्य राजा सत्याश्रय पुलकेशी याच्या ऐहोळे येथील कोरीव लेखांवरून दिलेला आहे. याचा काल इ. स. ६३४ (शक ५५६ ) होय. यांत महाराष्ट्राच्या मर्यादा सांगितल्या आहेत. तीन महाराष्ट्र के म्हणजे (१) अश्मक = खानदेश धरून विदर्भ, (२) कुंतल (कृष्णा कांठचा प्रदेश) आणि (३) अपरान्त (कोंकण) हे प्रदेश होत. महाराष्ट्रक हे महाराष्ट्र शब्दाचे लघुत्वदर्शक रूप आहे. ऐहोळे येथील लेखाचा अधिक परिचय, प्राचीन विभाग, उतारा क्र. ३३ पहा. ] विधिवदुपचिताभिश्शक्तिभिश्शक्रकल्पः तिसृभिरपि गुणौघेस्स्वैच्छ माहाकुलाचैः अगमदधिपतित्वं यो महाराष्ट्रकाणां नवनवतिसहस्रग्रामभाजां त्रयाणां ॥२५॥ ज्याने तिन्ही शक्त्या विधियुक्त आपल्या काबीज केल्या आहेत आणि त्यामुळे जो इंद्रतुल्य दिसत आहे, ज्याच्या उच्च घराण्यांतील जन्मामुळे व इतर उत्कृष्ट गुणांमुळे, आणि आपल्या इच्छाशक्तीने ज्याने ९९ हजार खेडी असलेल्या तिन्ही महाराष्ट्रावर आपलें आधिपत्य मिळविलें (डॉ. केतकरकृत अनुवाद) [ १