पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/192

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवकालीन महाराष्ट्राची सीमा १६३ जैसी पुस्पांमाजी पुस्प मोगरी । की परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भासांमाजी साजिरी ।। मराठिया ॥ ३ ॥ पाखंयांमधे मयोरू । वृाखयांमधे कल्पतरु। भासांमधे मानु थोरू । मराठियेसी ।।४।। तारांमधे बारा रासी । सप्तवारामधे रवि ससी ।। या दिापचेयां भासांमधे तैसी । बोली मराठिया ॥ ५॥ ५ :: :. शिवकालीन महाराष्ट्राची सीमा [ डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांनी " शिवाजीची परकीयांनी लिहिलेली चरित्रे Foreign Biographies of Shivaji या नांवाचा ग्रंथ संपादित केला आहे. त्यांत फ्रेंन्सिस मार्टिन (फ्रेंच) कॉस्मा-द-गाड (पोर्तुगीज) व दुस-या डच लेखकांनी शिवाजीसंबंधी लिहिलेली चरित्रात्मक माहिती इंग्रजीत अनुवाद करून दिली आहे. पोर्तुगीज लेखक कॉस्मा-द-गाड याने इ. स. १६९५ मध्ये म्हणजे सभासदी बखरीच्या अगोदर दोन वर्षे शिवाजीचे चरित्र लिहिले, त्यांतील प्रारंभींचा उतारा पुढे दिला आहे. महाराष्ट्राची सीमा कोणती ते या उता-यांत आलेले आहे. ] ४ पक्ष्यांमध्ये. ५ वृक्षांमध्ये. ६ द्वीपेचेया-बेटांतील; दक्षिणेकडील प्रदेशास जंबुद्वीप म्हणत. उदाहरणार्थ पूजेस प्रारंभ करतांना ‘जंबुद्वीपे, देशे दंडकारण्ये गोदावर्याः दक्षिणेतीरेः' असा मंत्र म्हणतात. | [ ७