पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/198

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवाजीचा जन्म । १६९ ८। । ' शिवाजीचा जन्म [ [ शिवाजीचा जन्म एके काळीं शके १५४९ वैशाख शु. २ (इ. स. १६२७) असा समजला जात असे, याचे कारण कित्येक बखरीत शके १५४९ हें शिवजन्माचे साल दिले जाई. पण सभासद बखरींत जन्मतिथि दिलेली नाहीं. अन्य बखरी उत्तर पेशवाईतील असल्याने तो पुरावा विश्वसनीय नव्हता. या कोणत्याहि बखरींत शिवाजीचा जन्म तिथि, वार, नक्षत्र, शक यांसह बिनचूक दिलेला नाही. मराठी इतिहासाच्या साधनांत समकालीन अस्सल पत्रकांइतकेच नसले, तरी त्याच्या खालोखाल समकालीन शकावलींना महत्त्व आहे. या शकावल्या पूर्वी प्रत्येक मोठ्या घराण्यांत तयार करीत. जेधे शकावली अशाचपैकी आहे. या शकावलींत अनेक महत्त्वाचे उल्लेख अचूक सांपडतात. जेधे शकावलींत निदष्ट केलेल्या शिवाजीच्या जन्मतिथीस आणखी स्वतंत्र पुरावा मिळतो. कवींद्र परमानंदाने शिवाजीच्या हयातीत लिहिलेले 'शिवभारत' नांवाचे काव्य आहे, त्यांतहि शके १५५१ फाल्गुन व. ३ हीच तिथि आहे. तसेच तंजावर येथे बृहदीश्वराच्या देवालयावर असलेल्या शिलालेखांत शिवभारताच्या आधारे याच सालाचा उल्लेख आहे. याखेरीज पं. गौरीशंकर ओझा यांच्या प्राचीन कुंडली संग्रहांत असलेली शिवाजीची कुंडली याच तिथीस जुळणारी आहे. इतके स्वतंत्र, समकालीन व विश्वसनीय पुरावे एकत्र मिळाल्याने शिवाजीची परंपरागत जन्मतिथि बदलून बहुतेक इतिहासकारांनी या तिथीचा स्वीकार केला आहे. तथापि अशा प्रसंगांचा निर्णय करतांना संशोधकाची दृष्टि तरुण अभ्यासकांस यावी म्हणून प्रमुख बखरींतील व या विषयाचे वर उल्लेखिलेले अन्य उतारे पुढे दिले आहेत. | बखरींत तरी का होईना चुकीचा शक कसा असावा याचा छडा लागणे कठिण आहे, पण तो न लागल्याने इतिहासाच्या कांहीं अभ्यासूना अद्याप जुनी तिथि अमान्य करणे अवघड वाटते. या चुकीची काहींशी मीमांसा श्री. ज. स. करंदीकर यांनीं 'पराग' मासिकाच्या सप्टेंबर १९४८ च्या अंकांत पुढीलप्रमाणे केली आहे :

    • गुरुवार शाबान १४ हा अकबराचा वास्तविक जन्मदिवस असतां कोणाला कांहीं करणी करितां येऊ नये म्हणून मुद्दाम रविवार रजब ५ हा खोटा जन्मदिन प्रचलित करण्यांत आला, असे व्हिन्सेंट स्मिथने

[ [ १३