पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/199

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास - ‘अकबर दी ग्रेट मोगल' या पुस्तकांत (पृ. १८ वरून) म्हटले आहे. यावरून राजघराण्यातील किंवा इतर प्रसिद्ध पुरुषांची खरी जन्मतिथि गुप्त राखण्यासाठी भलताच जन्मदिवस रूढ करण्याची प्रथा त्या वेळी होती हे दिसून येते. याच कारणावरून शिवाजी महाराजांचाहि खरा जन्मदिवस गुप्त राखून, त्यांच्या पूर्वीच्या अल्पवयांत मृत्यु पावलेल्या भावाचा जन्मदिवस किंवा कोणता तरी एक कल्पित दिवस ‘शिवाजीचा जन्मदिवस' म्हणून रूढ करण्यांत आला असावा इ. स. १६२७ मधील जन्मतिथि प्रचारांत कां आली या शंकेचे निरसन अकबराच्या जन्मदिवसाच्या फेरवदलावरून होईल, असा भरंवसा वाटतो, खालीं शिवजन्मतिथीचे आधार-ग्रंथांतील अनेक उल्लेख, दिले आहेत. ] | | | -१-- ।। त्या समयांत इकडे जिजाबाईसाहेब गुरुदर म्हणोन शिवनेरी येथे ठेविली होती. त्यास (पुत्र जाला.) शिवनेरी येथे शिवाई देवी बहुत जागृत आहे. तिजला बाईसाहेबांनी नवस केला जे पुत्र जाला म्हणजे तुझे नांव ठेवीन. त्यानंतर दिवस पूर्ण होवून प्रसूत सुसमयीं शके १५४९ पंधराशे एकूणपन्नास प्रभवनाम संवत्सरे वैशाख शु।। २ गुरुवारी पुत्र जाला. शुभ चिन्हे जालीं. विजापुरी महाराज यांस शुभ शकुन जाले. सा गृह अच्च पडले. सर्व लक्षण संपन्न जाले, नांव शिवाजी राजे ऐसे ठेविले. शाहाजी राजे यांस स्वप्नगत दृष्टांत जाला.... -शिवचरित्र प्रदीप पृ. ७५. चिटणीस बखर


शके १५५१ शुक्ल संवत्सरें। फालगुण वद्य त्रितीया शुक्रवार नक्षत्र हास्त घटी १८ पळे ३१ गड ५।। पळे ७ ये दिवसी राजश्री सिवाजी राजे सिवनेरीस उपजले १ श्रावणे पुणमेस लुखजी जाधवराव नीजामशाहानी मारिले १

- - शिवचरित्र प्रदीप पृ. १६.जेधे शकावलि. X X १४]