पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/211

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास आपण उभयतां पेटारियांत बसून निघोन चालिले. चौकीचे लोक होते त्यांनी एक दोन पुढील पेटारे उघडून पाहोन वरकड पेटारे न उघडितां जाऊ दिले. शहरावाहेर दोन कोसांवरि जाऊन, पेटारे टाकून, पायउतारा होऊन, कारकून ज्या गांवीं होते त्या गांवास गेले. कारकून बराबरी घेतले. अवघियांनी रानांत बसून विचार केला की, “ आतां जरि नीट आपले देशास जातो, तरि तिकडे लाग करून फौजा धावतील. तिकडे जाऊ नये. दिल्लीपलीकडे जावे, वाराणशीकडे जावे. असे करून राजे व संभाजीराजे व निराजी राऊजी व दत्ताजी त्रिंबक व राघो मित्रा मराठा ऐसे निघोन चालिले. वरकडांस मनास मानेल तिकडे जाणे, म्हणून सांगितले. आपण व राजपुत्र व इतर लोक कारकून ऐसे वाराणशीकडे आंगास राखा लावून, फकिराचे सोंग घेऊन मथुरेकडे गेले. ....... पोलादखानाने पादशहाजवळ वर्तमान सांगितले की “ राजा कोठडीत होता. वरचेवर जाऊन पाहत असतां एकाएकीं गइब जाहाला. पळाला किंवा जमिनीमध्ये घुसला की अस्मानामध्ये गेला, हे न कळे. आम्ही जवळच आहों. देखत देखत नाहींसा झाला. काय हुन्नर जाहला न कळे." | .... आणि पादशाहांनी मनांत शंका धरली कीं " राजा शहरांत कोठे दडून राहिला असेल, आणि रात्रीस आपणांस दगा करील.' म्हणून तजवीज करून, बहूत सावध चौकी पहारा ठेवून जागेच पलंगावर राहून बैसले. लोक कंबरबस्ती करून रात्रंदिवस जवळ ठेवले. ये जातीने राहू लागले. अभ्यास:--अशा त-हेने तुरुंगांतून सुटका करून घेतलेल्या काही भारतीय व आयरिश देशभक्तांची नांवें सांगा; | १. शिवाजी दिल्लीस न जातां आगरा येथे गेला होता. आग्रा येथून मथुरस जाणे शिवाजीस अनुकूल होते. दिल्लीहून मथुरेकडे जातां तर तो पाठलाग करणारास सांपडण्याचा संभव जास्त होता. “ दिल्लीस गेला, हा मराठा बखरकारांचा व ग्रांट डफचा गैरसमज झाला असे म्हणावे लागते. "आतां जरि नीट आपले देशास जातो' वगैरे वाक्येहि चिंतनीय आहेत. २ गाइब = गायब, गुप्त, नाहींसा. ३ युक्ति. ४. व्यवस्था. ५ कंबर बांधून २६ ]