पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/216

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गृहकलह बरा नव्हे १८७ यैसियास, राजकारण-प्रसंगे आम्ही कुत्बशहाचे भेटीस भागानगरास गेलो. तेथून कर्नाटकांत गेलों. चंजीस आलों. चंजी घेतली, व येलूरतर्फेचा मुलूख घेतला, व शेरखानास झगड्यांत मोडून गर्देस मेळविलें. शेरखानाचे हातीं मुलूख होता तेव्हढाही घेतला. त्यावरी मजल दर मजल कावेरी तीरास गेलो. तेथून तुम्हांस पत्रे लिहिली, कीं राजश्री गोविंदभट गो' व राजश्री काकाजीपंत व राजश्री निळोबा नाईक व राजश्री रंगोबा नाईक व तिमाजी यख्तियारराऊ असे भले लोक आम्हांपासीं पाठविणे, म्हणून तुम्हांला बहुतां रीतीं लेहून पाठविले. त्यावरून तुम्हीं सदर्ह भले लोक आम्हांपाशीं पाठवून दिले. त्या भल्या लोकांशी बहुतां रीतीं धरोनियाचा व्यवहार सांगून आमचा अर्धा वांटा आम्हांस ब-या बोलें द्या, म्हणून सांगून पाठविलें ; व त्या बराबरी राजश्री बाळंभट गोसावी, राजश्री कृष्ण ज्योतिषी, कृष्णाजी सखाजी असे आपले तर्फेनें भले लोक दिल्हे. हे भले लोक तुम्हांजवळी जाऊन बहुतां रीतीं बोलिलें कीं गृहकलह करू नये, आपला अर्धा बांटा मागतात तो द्यावा यैसें बोलिले. परंतु कपटबुद्धि तुम्ही ऐसी मनीं धरिली, की या समयांत आम्ही थोर राजे झालो आहों. आम्हांसी आपण खासा भेटीस येऊन इलभल५ नरमी वहत दाखवावी. आणि आमचा वांटा बडवावा. तेरा वर्षे सारें राज्य आपणच खादलें, पुढेही आपणच सारें राज्य खावे अशी बुद्धि मनीं धरून वांटियाचा निवाडियाची ६ तह न करित आपण खासच आमचे भेटीस आलेस. यासआमची व तुमची भेट झाली. त्या उपरी आम्ही बहुतां रीतीं तुम्हांसी बोलिलों, की आमचा अर्धा वांटा द्या. परंतु तुम्ही वांटा द्यावा हा विचार मनी धराचना. मग जरूर जाहलें, की तुम्हीं धाकटे भाऊ; आपण होऊन आमचे भेटीस आले (त), यास तुम्हाला धरावे आणि वांटा मागोवा ही गोष्ट थोरपणाचे इज्जतीस' ल्याख' नव्हे. या निमित्त तुम्हांस चंजावरास जावयाचा निरोप दिला. तुम्ही चंजाउरास गेलेसी. आम्ही स्वारहोऊन तोरगळ प्रांतास आलो. तेथे अशी खबर ऐकली, कीं तुम्हीं तुरुक लोकांच्या बुद्धीस लागून, आमचे लोकांशी झगडा करावा असे मनीं धरून आपली सारी जमेत' एकवट करून आमचे लोकांवर पाठवून दिलेत. ते २ जिजी. ३ धुळीस. ४ गोसावी. ५ उतावीळपणे, वरवर. ६वाट्यांचा निर्णय करण्याचा. ७ प्रतिष्ठेस. ८ लायक, योग्य. ९ जमाव. [ ३१ ।