पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/218

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवाजीची समथस सनद १८९ बरा नव्हे. आम्ही तरी वडीलपणे आजीवरी १८ तुम्हांला सांगितलें आतांही सांगतो. एकाल तरी वरें, तुम्हीच सुख पावाल, नाइकाल तरी तुम्हींच कष्टी व्हाल आमचे काय चालतें ? वहुत काय लिहिणे. मर्यादेयं विराजते. १७.: ।। शिवाजीची समथास सनद श्रीरामदासवचनामृत, ( आश्विन शु० १० पृ. १९९-२०० शके १६०० [ समर्थ-शिवाजी यांचे परस्पर संबंध लक्षांत येण्यास हा उतारा उपयुक्त आहे. ] श्रीरघुपती । श्रीमारुती श्रीसद्गुरुवर्य श्रीसकळतीर्थरुप श्रीकैवल्यधाम श्रीमहाराज स्वामीचे सेवेसीं-- चरणरज शिवाजी राजे यांनी चरणाबरी मस्तक ठेऊन विज्ञापन जे मजवर कृपा करुनु सनाथ केले. आज्ञा केली की तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करून घर्गस्थापना, देव-ब्राह्मणाची सेवा, प्रजेची पीडा दूर करुनु पाळण, रक्षण करावे; हे व्रत संपादून त्यांत परमार्थ करावा. तुम्हीं जें मनीं धराल तें श्रीसिद्धीस पाववील. त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक (पाठभेददुराढे) लोकांचा नाश करावा, विपुल द्रव्ये करुनु राज्यपरंपरा अक्षइ चालेल १८. आजवर. १ मोक्षाचे माहेरघर. २ पायाची धूळ. ३ की, ४ यावरून राज्यस्थापनेचा उद्योग सुरू करण्यापूर्वी, निदान त्यास मोठे स्वरूप येण्यापूर्वीच समर्थ-शिवाजी भेट झाली असली पाहिजे हे उघड आहे; यानंतर कित्येक वर्षांनीं चाफळ येथे श्रीरामाची स्थापना झाली त्यानंतर हे पत्र लिहिले गेले आहे. समर्थ-शिवाजीसंबंधाची त्रोटक परंतु मुद्देसूद चची प्रा. रानडे यांनी रामदासर्वचनामृताच्या प्रस्तावनेत केलेली आहे. [ ३३