पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/227

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास भाग्य पार होन १,०४ ० ० ०. राजश्री कृस्णाजी घोरपडे १२५०० (रायग) ड प्रांत कबज (केल्यावरी) १२५०० विजापूर हस्तगत झाल्यावर १२५०० भागानगर घेतल्यावर १२५०० औरंगावाद घेतल्यावर ५ ० ० ० ० दिली घेतलेवरी १ ० ० ० ० ० येणेप्रमाणे सहा लक्ष होन पााचा सरजाम करून द्यावयाचा निश्चय केला आहे. नवे स्वाराचा जमाव माफिक सरजाम करून देऊ येकनिस्टपण सेवा करात्री स्वामी तुमचे बहुत प्रकारे चालवितील गनिमा कडील लुटीमध्ये जो जिनस येईल त्यापैकी निमे द्रव्य व हती व निशाण व दमामा यैसे स्वामी वरकड घोडीसहित तुम्हास माफ असे छ१६ रमजान सुाा इसने तिसैन अली (नि) वहुत लिहिणे तरी सुज्ञ असा. २२ : शिवाजी ते शाहूपर्यंतची शुद्धीकरणाची परंपरा [महाड हायस्कूलांतील इतिहाससंशोधक शिक्षक श्री. शां. वि. आवळसकर यांनी संपादिलेला आंगरेकालीन पत्रव्यवहाराचा लहानसा खंड भा. इ. सं. मंडळाने आपल्या त्रैमासिकाच्या द्वारें वर्ष २८३, अंक ३-४ एप्रिल १९४८) प्रकाशित केला आहे. इ. स. १५०० पासून १७७७ पर्यंतची ८६ पत्रे यांत आहेत. १७--८ पत्रे सोडली तर बाकी सब पत्रे चौलच्या अधिकारी दप्तरांतील आहेत. आर्थिक, सामाजिक, राज कीय, व्यापारविषयक अशी अनेकविध माहिती या पत्रांतून मिळते. यापक ले. ४२ पुढे दिला आहे. त्यासंबंधी संपादक प्रास्ताविक पृ. ४ वर लिहितात :‘याचा इत्यर्थ असा की, थोरल्या छत्रपतींच्या कारकीर्दीत परधर्मात गेलेल्यांचे शुद्धीकरण अपवाद म्हणून का होईना होऊ लागल: तसे शुद्धीकरण होत राहणे अवश्य होते. कारण साष्ट वारदेश व कोल चौलकडे फिरंग्यांनीं वामिक आक्रमण करून प्रजेस त्रस्त केले. स्वधमात परत यावे असे त्यास वाटे. छत्रपति संभाजीच्या कारकीर्दीत या प्रश्नास चालना देण्याचा प्रयत्न झाला व वसई-रेवदंडा ताब्यात

  • एकनिष्ठपणे. ४२]