पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/237

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०८ हिंदुस्थानचा साघनरूप इतिहास असेल या गोष्टीचा विचार कैसा म्हणाल तर तीर्थरूप कैलासवासी नाना' याची नजर रयेत पाळावी अशेष जनाची दुवा घ्यावी हेच त्याच्या चितात कायावाङ्मन्सा होते तदनरूपच अरण्यवत् मुलूख जाहाला होता त्यास कौल देऊन कंटकाचा उच्छेद करून रयेत नादविली रयेतीचा आसीर्वाद घेतला तन्मुले नानाची कीर्ती लोकोत्तर प्रकाशमान जाहाली नानाचा काळ जाहाला तीर्थरूप राव प्रधानपदास आठई जाहाले राजश्री (मो. जा’ ) स्वामीनी कृपा करून गौरव केलें नानाच्या पदरीं रयेतेची दुवा व देव ब्राह्मणाची स्थापना केली त्यांचा आसीर्वाद पदरीं विपुल ते पुण्य नानानी रायाचे पदरीं बांधले व रायांचीही वुध रयेत परिपाळणांस पूर्ण देवा ब्राह्मणाची स्थापना करून काश्या दीक महास्थळी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार केला पुढे उतर प्राती कीर्तीलता प्रफुल्लित केली. विश्वेश्वराची स्थापना करावी हे आर्त होतीच नानानी कीर्ती संपादिली त्यापेक्षा दशगुणीत कीर्ती जगत्यात रायाची प्रकाशमान जाहाली राव पूर्ण प्रतापी प्रतिश्रिष्टकर्ते होते त्याचे पुत्र चिरंजीव राजश्री नाना आहेत सर्वा प्रकारे वृधिमंत वडील वडिलोपाजित येशकीर्ती घडून आला ते अभिवृधीस पावावयास निपुण आहेत राव असता सरदार व फौज व कार्यकर्ते पुरुष पदरीं होते तेच प्रस्तुत आहेत ज्या ज्या गोष्टी रायानी संपादिल्या व संपादावयाच्या चितांत आल्या त्याचा परिणाम लावावा हेच त्रिकर्ण पुरसर चितांत आहे. सारे फौजेची सिधता करून दसरा होतांच उभयेतातून येकजण सरदार सहवर्तमान घेऊन त्या प्रांते येऊन तदोतर राजामलजी (स घे) ऊन तुम्ही पुढे येणे सवाईजी व राणाजी यांचे भेटीचा विचार करून अभेसिंगजीसह। उभयेताचे विचारे आपणाजवळ आणून भारी होऊन सार्वभोमाची इच्छा असेल तदनरूप कर्तव्यार्थ संपादेणे तो संपादिला जाईल. कदाचित नकारपूर्वक आदिकरून दीर्घ दृष्टी न देता अल्पबुद्धीस प्रवर्तन राव गेले अतःपर का राहिलें म्हणून आम्हासी विरूध वर्ततील तर काय मुजाइकाई आहे लक्ष फा व उमेदे सरदार आमच्या पदरी आहेत नकारपूर्वकस मुळीच ठिकाणी लावा | १ बाळाजी विश्वनाथ. २ आ-ठायी = स्थानापन्न. ३ मूळ पत्रातमा जागा. ४ प्रतिसृष्टि कर्ते. ५ निजाम. ६ पर्वा, फिकीर. ५२] मूळ पत्रांत मोकळी