पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/38

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सिंधूच्या खो-यांतील संस्कृति सिंधूच्या खो-यांतील संस्कृति [ अलीकडे पुराणवस्तुसंशोधनाचे काम चालू आहे. त्यामध्ये भूपृष्ठाखालीं गडप झालेली संस्कृति उजेडात आणण्यासाठी उत्खनन करणे हा प्रमुख कार्यक्रम आहे. इ. स. १९२४ मध्ये हरप्पा व मोहेंजोदरो या गांवांजवळ जमिनीच्या खाली २० ते ७० फूट खणल्यावर, संपन्न व सुसंस्कृत लोक राहात असलेल्या मोठ्या शहरांचे अवशेष सांपडले. मोहेंजोदरो (म्हणजे मृतांच्या टेकड्या) हे गांव सिंध प्रांतांतील लारखाना जिल्ह्यांत आहे. सिंधूचे मुख्य पात्र व नारा कालवा यांच्या दरम्यान या टेकड्या आहेत. हरप्पा हे पंजाबमध्ये आहे. | या उत्खननांत सांपडलेली घरे, भांडी, दागिने, शस्त्रे, खाद्य पदार्थांचे अवशेष, स्नानघरे इत्यादींवरून या प्राचीन संस्कृतीची अनुमाने काढली जातात. कांहीं मोहरांवर चित्रलिपीत लिहिल्यासारखे आढळते. पण या लिपीचे ज्ञान नसल्याने ते वाचणे शक्य झालेले नाहीं. प्रत्यक्ष लेख ज्ञात झाला नसल्याने कांहीं सांपडलेल्या वस्तूंचीं चित्रे येथे दिली आहेत.] शिवालंग मोहोंजदरो संस्कृतींत याप्रमाणे पिंडीचे आकार आढळतात. यावरून शिवपूजा तत्कालीं असावी असा अंदाज केला जातो.