पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/41

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ । ८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास | शिक्के व मुद्रा --हें तत्कालीन लिपीत केलेले लेखन असावे. --हें गेंड्याचे चित्र आहे. याचप्रमाणे वशिंड नसलेल्या व वशिंड असलेल्या बैलांची चित्रेहि आढळतात, पण घोड्याची चित्रे फारशीं आढळत नाहींत. वेदकाली अश्वांचा उल्लेख वारंवार आढळतो. येथे मुख्यतः त्रिशुळधारी शिवाचे चित्र काढलेले आहे. त्याच्या डाव्या बाजूस वाघ आहे. सिंह येथे दिसत नाहीं. शिवाच्या भोवती असलेल्या चित्रसंभारावरून त्यास ‘पशुपति' हे नांव शोभते. असे शिक्के व मुद्रा पुष्कळ सांपडतात. बरेचसे शिक्के नरम दगडावर कोरलेले आहेत. कांहीं थोडे धातूवरहि कोरलेले आढळतात.