पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/46

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अराजक राष्ट्राची दुःस्थिति १३ ...आक्रोशयुक्त, आनंदरहित व अचूंनीं कंठ दाटून आलेल्या लोकांनी भरलेली अशी ती रात्र* अयोध्येमध्ये फारच लांब वाटून शेवटीं निघून गेली. तेव्हां रात्र संपून सूर्योदय झाल्यावर राज्यकार्यधुरंधर द्विज जुळून सभेमध्ये आले. मार्कडेय, मौद्गल्य, वामदेव, कश्यप - - - द्विज अमात्यसहवर्तमान, श्रेष्ठ राजपुरोहित वसिष्ठ मुनींकडे तोंड करून बसले. आणि राज्यकार्यासंबंधाने बोलू लागले. ते म्हणाले, “ पुत्रशोकाने हा राजा मृत्यु पावल्यामुळे दु:खाने आम्हांला शंभर वर्षांसारखी झालेली ती रात्र एकदांची निघून गेली. महाराज दशरथ स्वर्गवासी झाला आहे, राम अरण्यांत गेला आहे, तेजस्वी लक्ष्मणहि रामाबरोबरच चालता झाला आहे, आणि उभयतां शत्रुतापन भरत-शत्रुघ्न कैकेय देशांतील राजधानीमध्ये रमणीय राजवाड्यांत आपल्या आजोळी आहेत. तेव्हां इक्ष्वाकुवंशापैकी आजच्या आज कोणीतरी राजा करावा. कारण हे आपले राष्ट्र असेच अराजक राहू दिलें असतां नाश पावेल..... ‘अराजक राष्ट्रामध्ये मूठभर बीदेखील कोणी पेरीत नाही. राज्य अराजक झाले असतां पुत्र पित्याच्या अथवा स्त्री भत्र्याच्या आधीन राहात नाहीं, अराजकांमध्ये धन नाहीं, भार्याहि नाहीं हे एक मोठेच भय आहे. मग पितापुत्ररूप आणि स्त्रीपुरुषरूप सत्याला जर ठिकाण नाहीं, तर क्रयविक्रयरूप सत्याची गोष्ट अराजकामध्ये पाहिजे कशाला ? | "राष्ट्र अराजक झाले असतां लोक सभा भरवीत नाहींत, रम्य वागा तयार करीत नाहीत व आनंदित होऊन पुण्यसंपादक अशा धर्मशाळा वगैरेहि बांधीत नाहींत... अराजक राष्ट्रामध्ये आनंदित नट व सूत्रधार ज्यामध्ये आहेत असे राष्ट्राच्या अभ्युदयाला होणारे देवादिकांचे उत्सव आणि समाज वृद्धिंगत होत नाहींत. “अराजक राष्ट्रामध्ये कांहीं विषयाला उद्देशून लोक वादविवाद करू लागले असता त्यांच्या मुद्यांचा निर्णय होत नाही, आणि कथाप्रिय लोकांनी कथन केलेल्या कथांच्या योगाने कथा ऐकण्याची ज्यांना गोडी आहे अशा लोकांचे चित्तरंजन नाहीसे होते.

  • दशरथाच्या मृत्यूनंतरची पहिली रात्र.