पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/47

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास “अराजक देशांत सुवर्णभूषणांनीं भूषित झालेल्या कुमारिका एकत्र जुळून सायंकाळीं बागांतून क्रीडा करण्यास जात नाहींत. अराजक देशांत धनिक लोक सुरक्षित नसतात, आणि शेतकी व गोरक्षण यांवर उपजीविका करणा-या लोकांनाहि दार उघडे टाकन बाहेर पडतां येत नाहीं. अराजक देशांत बाण व अस्त्रे यांचा अभ्यास सुरू राहून एकसारखे बाण मारू पाहणा-या लोकांचा तलनिर्घोष ऐकण्यांत येत नाहीं. अराजक देशामध्ये दूर प्रदेशाला निघालेले उदमी पुष्कळ माल बरोबर घेऊन सुखरूप जात नाहींत. अराजक देशांत अवश्य असलेले मिळत नाहीं, व जे मिळाले असेल त्याचे रक्षण होत नाहीं. | ‘राज्य अराजक झाले असतां युद्धामध्ये सेना शत्रशीं तोंड देण्यास समर्थहि होत नाहीं. अराजक देशांत शास्त्रांत प्रवीण असलेले पुरुष वनांतून अथवा उपवनांतून बोलत उभे राहात नाहींत. अराजक देशांत नियमाने वागणारे लोक देवतांच्या पूजनाकरितां पुष्प, मोदक व दक्षिणा देत नाहींत. आणि अराजक देशामध्ये चंदन आणि अगुरु ह्यांनी चचित झालेले राजपुत्र वसंत ऋतूतोल शाल वृक्षांप्रमाणे झळकत नाहींत. । | ‘‘उदकरहित जशा नद्या, तृणरहित जसे वन, आणि गोपालरहित जशा गाई, तसेच राजरहित राष्ट्र होय. ध्वज ज्याप्रमाणे रथाची खूण आहे, धूम ज्याप्रमाणे अग्नीची खूण आहे, त्याचप्रमाणे जे राज्य चालविणारे असतात त्यांची राजा ही खूण असते. परंतु तो राजाच आतां देवलोकाला निघून गेलेला आहे. तेव्हां आतां आम्हाला कोणीहि मानणार नाहीं. ‘ज्याप्रमाणे शरिराचे हिताहित पाहण्याविषयीं दृष्टि नेहमी तयार असते, त्याचप्रमाणे सत्य आणि धर्म, आणि कुलवानांचे कुल, ह्यांचा प्रवर्तक राजाच असून माता, पिता व प्रजा यांचे पालन व हित पाहाणारा राजाच आहे. उदार आचरणाने युक्त राजा, यम, कुबेर, इंद्र, आणि महाबलाढ्य वरुण ह्यांना मागे टाकतो. अहो, वन्यावाईटाची व्यवस्था लावणारा राजा जर जगतामध्ये नसेल तर हे जगत् अंधःकारासारखेच होऊन कशाचाच उमज पडणार नाही. ‘असो. महाराज दशरथ जिवंत असतांहि, समुद्र ज्याप्रमाणे मर्यादेपाशी आल्यावर तिचे अतिक्रमण करत नाहीं त्याचप्रमाणे आम्ही आपल्या आज्ञेचे अतिक्रमण केलेले नाहीं (कधीही). हे द्विजश्रेष्ठ वसिष्ठ मुने, आपण आमच्या म्हणण्याकडे लक्ष द्या, आणि इश्वाकु कुलांतील एखादा राजपुत्र अथवा