पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/5

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन अमृततुल्य तत्त्वें*
त्रीण अमृतपदानि स्वनुप्रितानि नयंति स्वर्गम् --दमस्त्यागो अप्रमादश्च ।

अर्थ: तीन अमृततुल्य तत्त्वे चांगल्या प्रकारे स्वतः आचरलीं तर ती माणसास स्वर्गास पोहोंचवितात. (१) इंद्रियदमन, (२) त्याग, अर्थात् दान व (३) अप्रमाद, अर्थात् सदवर्तन.
वरील वचन हेलिओडोरसचे आहे. हेलिओडोरस हा ग्रीक ( यवन) गृहस्थ इ. स. पू. १५५ चे सुमारास गुंग घराण्यांतील विदिशेचा राजा काशीपुत्र भागभद्र याजकडे तक्षशिलेचा राजा डेमिट्रियस याजकडून वकील म्हणून आला असता, त्याचे पदरीं कैक वर्षे राहिला. येथे त्यास वैष्णवधर्माची आवड उत्पन्न होऊन त्याची दीक्षा त्याने घेतली आणि या धर्मपरिवर्तनाची खण म्हणून त्याने भिलसा येथे स्तंभ उभारून त्यावर वरील वचन कोरविले. भिलसा हैं भोपाळचे उत्तरेस ३०/३५ मैलांवर हल्ली रेल्वेस्टेशन आहे. भिलसा म्हणजेच प्राचीन विदिशा होय.

|* रियासतकार श्री. नानासाहेब सरदेसाई यांना अर्पण पत्रिक - बद्दल अनुमतिदाखल विचारले असतां ‘माझ्या परवानगीची जरूर मला वाटत नाही. आपल्यावर निर्बध घालण्याचा मला अधिकार काय ? मला विचाराल तर आपण हे पुस्तक मला अर्पण करू नये. तथापि आपणां उभयतांस योग्य दिसेल ते करावे' असे उत्तर लिहिले त्यांतच अनुषंगाने वरील सूंदर उतारा माहितीदाखल दिला. हा रियासतकारांचा प्रसाद आम्ही प्रमाने स्वीकारून तो अभ्यासकांस नजर करतो.



                                                                --संपादक