पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/50

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धर्म-नारद संभाषण आजचे स्वरूप त्या ग्रंथास ख्रिस्ती सनाच्या तिस-या शतकांत प्राप्त झाले असा काही विद्वानांचा तर्क आहे. तर निदान सुमारे नऊ हजारः :: श्लोक बुद्धपूर्वकालीन आहेत यात शंका नाही. भारताचा काल . अनिश्चित असला तरी कोणाच्याहि मतें तो इ. स पू.१३००हून अलीकर , येऊ शकत नाहीं. | या ग्रंथांत व्यावहारिक शहाणपणा शिकविणारे प्रसंग व संवाद इतके आहेत की त्यांवरून 'व्यायोच्छिष्टं जगत्सर्वं' म्हणजे 'सर्व जगांतील शहाणपण या ग्रंथांत सांपडू शकेल' अशी म्हण पडलो आहे. लोकांच्या चालीरीति, सामाजाचे आदर्श, राज-प्रजा यांची कर्तव्ये, युद्धांतील : शस्त्रास्त्रे, शिक्षण इ. तत्कालीन समाजाच्या विविध अंगांची माहिती कळण्यास या ग्रंथाइतकें बहुमूल्य साधन नाहीं. | कै. चि. वि. वैद्य यांच्या संपादकत्वाखाली या ग्रंथाचे मराठीत , भाषांतर झाले असून पूर्वी प्रसिद्धि पावलेली प्रकाशन संस्था दामोदरः । सावळाराम आणि मंडळी, यांनी हे प्रकाशित केलेले आहे. पुढील उतारा .. भाग तिसरा-सभापर्व अध्याय पांच यामधील आहे. मध्यंतरीं दिलेले " अंक श्लोकांचे क्रमांक आहेत. आपल्या बंधूंसह धर्मराज सभेत बसला असतां नारदमुनि तेथे आले.' एकमेकांनीं कुशल विचारल्यानंतर पुढीलप्रमाणे नारदांनीं धर्माला प्रश्न रूपांनी माहिती विचारून उपदेश केला. राजाने सदोदित जागृत राहून कोणती कृत्ये करण्यांत दक्ष असावे याचे पुढे दिलेलें तपशीलवार । वर्णन मनन करण्यासारखे आहे. ] तू निद्रेला वश होत नाहींस ना ? योग्य वेळीं तू जागा होतोस ना? ते अर्थशास्त्रज्ञ* आहेसच; तू पहाटेच्या वेळी आपल्या अर्थस्थितीचा विचार करतोस ना ? (३०) विश्वास, निलभी, परंपरागत काम करीत असलेले असे तुझे कामकरणारे आहेत ना ? राजा, तुझ्या कागारांना काम संपली कोणतीं, बहुतेक चुरी झाली कोणतीं, कोठल्या कामाला प्रारंभ व्हावयाचा आहे, इत्यादि गोष्टी समजतात ना ? वीरा, तुझ्या राज्यांतील कारणिक (शिक्षक) सर्व शास्त्रांमध्ये आणि धर्मामध्ये निपुण आहेत ना? ते सर्व कुमारांना आणि योद्धयांना (उत्तम शिक्षण देऊन) तयार करतात ना ? (३४, ३५).

  • कोषशास्त्रज्ञ, राज्याच्या खजिन्याचे शास्त्र जाणणारा...', २ सा.इ.