पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/54

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्थितप्रज्ञस्य का भाषा २१

(५८) कांसव आपले अवयव (हस्तपादादि) ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी आंखडून घेतो त्याप्रमाणे जेव्हां एखादा पुरुष इद्रियांच्या (शब्दस्पर्शादि) विषयापासून (आपलीं) इंद्रिये आंवरून धरतो तेव्हां त्याची बुद्धि स्थिर झाली { म्हणावयाची ).

(५९) निराहारी पुरुषाचे विषय सुटले, तरी (त्यांतील) रस म्हणजे गोडी ही सुटत नाहीं. पण परब्रह्माचा अनुभव आल्यावर (सर्व विषय व त्यांतील) गोडीसुद्धा म्हणजे विषय व त्यांतल गोडी हों दोन्ही सुटतात.. . (६०) कारण, केवळ (इंद्रियदमनार्थ) प्रयत्न करणा-या विद्वानाचे देखील मन, हे कुंतीपुत्रा! हीं दांडगीं इद्रियं बलात्काराने भलतकडे ओढून नेतात. (६१). (म्हणून) या सर्व इंद्रियांचे संयमन करून युक्त म्हणजे योगयुक्त व मत्परायण होऊन राहावें. आपली इद्रिये याप्रमाणे ज्याच्या स्वाधीन झाली त्याची बुद्धि स्थिर झालो (म्हणावयाची). (६७) (विषयांत ) संचरणा-या म्हणजे वागणा-या इंद्रियांच्या मागोमाग जें मन जाऊ लागते तेंच-पाण्यांत नौकेस जसा वारा त्याप्रमाणेच-- पुरुषाची बुद्धि हरण करीत असते. (६८) म्हणून हे महाबाहो अर्जुना, इंद्रियांच्या विषयापासून ज्यांचीं इंद्रिये सर्व बाजूंनी आवरून धरलेलीं (असतात) त्यांचीच बुद्धि स्थिर झाली {म्हणावयाची). । (६९) सर्व लोकांना जी रात्र, तेथे स्थितप्रज्ञ जागृत असतो आणि सर्व प्राणिमात्र जेथे जागृत असतात, तेथे या ज्ञानवान् पुरुषास रात्र वाटत असते. (७०) चोहोंकडून (पाण्याने) भरत जात असतांहि ज्याची मर्यादा चळत नाहीं, अशा समुद्रात सर्व पाणी ज्याप्रमाणे शिरत असते, तद्वत् ज्या पुरुषांत सर्व विषय ( त्याची शांति न मोडतां) प्रवेश करतात, त्यालाच (खरी) शांति मिळते. विषयाची इच्छा धरणाच्याला (ही शांति मिळणे शक्य) नाहीं. (७१) सर्व काम म्हणजे आसक्ति सोडून जो पुरुष, नि:स्पृह होऊन (व्यवहारांत) वागतो, व ज्याला अहंकार नाहीं त्यालाच शांति मिळते ! | (७२) हे पार्था ! ब्राह्मी स्थिति (म्हणत त ती) हीच ही प्राप्त झाल्यावर कोणोहि मोहात पडत नाही, आणि अंतकाळीं म्हणजे मरणाच्या वेळीसुद्धा या स्थितीमध्ये राहून त्याला ब्रह्मनिर्वाण म्हणजे ब्रह्मांत मिळून जाण्याच्या स्वरूपाचा मोक्ष मिळतो. ,, ,, ---