पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/58

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बुद्धपूर्वकालांतील शस्त्र-विद्या २५ वाराणसीचा रस्ता धरला. रस्त्यांत तो श्लेषलोम यक्षाच्या जंगलाच्या द्धारापाशी आला. त्याला अरण्याच्या द्वारी पाहून मनुष्याने अडविलें " अरे माणवक या जंगलांत प्रवेश करू नकोस. या जंगलांत श्लेषलोम यक्ष आहे. तो ज्या कोणा माणसाला पाहतो त्याला मारून टाकतो." बोधिसत्त्व ... निर्भय केशरिसंहाप्रमाणे जंगलांत घुसला. त्याने जंगलांत प्रवेश केल्यावर, ताडाइतका (उंच), घराएवढा (विस्तृत), भांडयाइतके (मोठे) डोळे असलेला यक्ष बोधिसत्त्वाला म्हणाला, “ कहाँ जाता है ? ठहर, तु मेरा आहार है।” बोधिसत्त्वाने धमकाविलें * यक्षा, मी (माझ्या शक्तीचा) अंदाज घेऊन यथे प्रवेश केला आहे, तू सांभाळून माझ्याजवळ ये, मी तुला विषयक्त बाणांनीं विद्ध करून खाली पाडोन." त्याने विषयक बाण चढवून तो सोडला. तो यक्षाच्या अंगास चिकटला. त्यानंतर दुसरा --- असे पन्नास बाण त्याने सोडले. सगळे यक्षाच्या अंगाला चिकटले. त्या सगळ्या , बाणांची मोडतोड करून यक्ष बोधिसत्त्वाजवळ आला. । बोधिसत्त्वाने पुनः त्याला भीति दाखवून, तलवार काढून (त्याच्यावर) प्रहार केला. तेहतीस अंगुळे लांब तलवार यक्षाच्या अंगास चिकटली, तेव्हां त्याने बर्चीचा प्रहार केला; तीहि अंगाला चिकटली. (मुद्गलाची तीच स्थिति झाली.) तेव्हां तो म्हणाला, “हे यक्षा, ‘पंचावुधकुमार' हे नांव तूं ऐकलें नाहींस काय? तुझ्या अधिकारांतील जंगलांत प्रवेश करतांना मी धनुष्य इत्यादींवर भरंवसा ठेवून आलेलों नाहीं. मी माझ्या भरंवशावर प्रवेश केला. . तेव्हां तुला आज चूर्ण-विचूर्ण करून मारून टाकतों." असे मोठ्याने गर्जून त्याने उजव्या हाताने यक्षाला ठोसा दिला, तो त्याचा हातच चिकटला. (तीच स्थिति डावा हात, दोन्ही पाय, डोके यांची झाली.) तो कुमार पांच जागी चिकटलेला, पांच जागी बांधलेला, लटकत असतांनाहि निभंयच होता. यक्षाने विचार केला. हा एक पुरुषसिंह आहे, साधारण मनुष्य नाहीं. माझ्यासारख्या यक्षाने पकडले तरी हा भीत नाहीं.-- असा मनुष्य आजपर्यंत आपण पाहिला नव्हता. यक्ष म्हणाला, हे माणवक, तु मृत्यूला कां भीत नाहींस ? " " यक्षा, मीं कां भ्यावे ? जन्माला आल्यावर मरणार हे ठरलेलेच. माझ्या काखेत ‘ वज्र' आयुध आहे. हूं. मला खाल्लेंस. तरी तें (शस्त्र) पचवू शकणार नाहींस. तेव्हां मेलों तर