पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/60

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाडूवाला ‘भिक्षु झाला । २७:-

अभ्यास :--१ जातककालांत जहाजे कशाच्या साहाय्याने चालत.?. प्रवासाचा मुख्य हेतु काय? २. यावरून समाजस्थितिदर्शक कांय अनुमानें निघतात ?:::.

..............;:.:.: १३: । ....... । झाडूवाला 'भिक्ष’ झाला [ सुनीत य? नांवाच्या बुद्ध भिक्षुने पुढीलप्रमाणे : आपले वृत्त निवेदिले आहे. जातिभेदांमुळे त्रस्त झालेल्या खालच्या वर्गाच्या लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार को केला ते त्यावरून स्पष्ट होईल. पुढील उतारा रमेशचंद्र दत्त कृत 'एन्शन्ट इंडिया' या इंग्रजी ग्रंथांतून (भाग ४ था पृ. ११०-१११) घेतला आहे. हे वर्णन बुद्ध जिवंत असतांना म्हणजे इ. स. पू. ५ व्या शतकातील आहे.] | " मी अगदी हलक्या कुळांत जन्माला आलो. मी अगदीं गरीब आणि गरजू होतो. मी जे काम करीत होतो ते अगदीं नीच प्रतीचे होते. वाळलेला पालापाचोळा झाडणें हें तें काम होय. यामुळे लोक माझा तिरस्कार करीत, मला हिणवीत आणि कौतुक तर क्वचित होई. मी मात्र अत्यंत नम्रपणाने सर्वांना मान देत असे. अशा मनःस्थितींत मगघांतील प्रमुख शहरांतील भिक्षूच्या मेळाव्यांत मी बुद्धाला पाहिले. मी माझ्या डोक्यावरचे ओझे खाली टाकून दिले आणि त्याला नमस्कार करण्यासाठीं धांवत गेलों, दया येऊन तो श्रेष्ठ पुरुष तेथे थांबला. मग मी त्याच्या चरणावर डोके ठेवले आणि त्या श्रेष्ठ पुरुषाची प्रार्थना केली की भिक्षु म्हणून माझा तुम्ही स्वीकार करा. तेव्हा मला तो उदारधी स्वामी म्हणाला * ये, हे भिक्षु इकडे ये !!" हीच माझी भिक्षुची दीक्षा होय. ..... अभ्यास :---गौतम बुद्धाकडे सुनीत कां गेला ?