पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/62

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिकंदराने हत्तीदलाचा कसा पराभव केला ? तीन गोष्टी केल्यास मनुष्य देवतांच्या पायाशीं जातो. (२२५) जो मुनिजन अहिंसक आहे, ज्याचा शरिरावर ताबा आहे, तो अशा स्यानास जातो की जेथे बाण्याने कधीं शोक होत नाहीं. (३१५) ज्याप्रमाणें सीमान्त देशावरील नगर आंतून आणि बाहेरून सुसज्ज असते त्याचप्रमाणे आपले रक्षण करावें, एक क्षणहि जाऊ देऊ नये. वेळ निघून गेली म्हणजे नरकांत पडून शोक करण्याचा प्रसंग येतो. (३२२) जगामध्ये मातृसेवा, पितृसेवा, श्रमणत्व (संन्यास) आणि निष्पाप होणें हें सुखकर होय. | (३६२) ज्याचे हात, पाय आणि वाणी यांवर नियंत्रण आहे, जो उत्तम संयमी आहे, जो आपल्यांतच मग्न आहे, जो समाधियुक्त आहे, जो एकटा राहतो, जो संतुष्ट आहे त्यास भिक्षु म्हणतात. (३९३) जटा, गोत्र किंवा जन्म यावरून ब्राह्मण ठरत नाहीं, ज्याच्यांत सत्य व धर्म आहे तीच व्यक्ति पवित्र होय आणि तोच ब्राह्मण होय. | अभ्यास :--१. ब्राह्मण व भिक्षु यांची येथे कोणती लक्षणे सांगितली आहेत ? २. गीतेतील स्थितप्रज्ञाचे वर्णन यांतील कोणत्या श्लोकांशी जुळते आहे ? ३. बौद्धधर्म हा स्वतंत्र धर्म आहे कीं वैदिक धर्मात सुधारणा करमारा पंथ आहे ? या उपदेशावरून काय अनुमान निघतें ? ४. सीमेवरील नगर कसे रक्षण करतात असे यांत लिहिले आहे ? १४ : : शिकंदराने हत्तीदलाचा कसा पराभव केला ? [ शिकंदर ऊर्फ अलेक्झांडर याने हिंदुस्थानवर (इ. स. पूर्वी : ३२७) स्वारी केल्यापासून युरोपांत हिंदुस्थानची विशेष माहिती : होऊ लागली. त्याच्या मृत्यूनंतर मौर्य राजांच्या दरबारांत ग्रीक वकील । आलेले होते. त्यांनी येथील परिस्थितीचे वत्तांत लिहिले आहेत. यांतील मेगॅस्थेनीसकडून पृष्कळ माहिती मिळते. याचे मूळ पुस्तक सांपडत नाहीं, पण त्यांतून स्ट्रेबो, एरियन, डिडोरस, अदि ग्रीक लेखकांनी घेतलेल्या उता-यांचा संग्रह(Indikaof Megasthenes & Arrian) या नांवाने प्रसिद्ध आहे. (संपादक डॉ. मॅक्रिडल) पुढील उतारा एरि-::- यन या दुस-या लेखकाचा आहे. एरियन हा ग्रीक-रोमन (GraecoRoman) अधिकारी होता. त्याने इ. स. च्या दुस-या शतकांत