पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/64

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१ पाटलिपुत्राचा विस्तार १५ ::.:.:.. १०. पाटलिपुत्राचा विस्तार ::| मेगॅस्थिनीसने पाटलिपुत्र नगरासंबंधी पुढील वर्णन लिहिले आहे.] | शोण आणि गंगा नदीच्या संगमावर पाटलिपुत्र शहर वसले आहे. गंगा ही मोठ्या नद्यांपैकी असून शोणचा क्रमांकहि तिसरा लागेल. पाटलिपुत्र हैं मोठे नगर आहे. त्याची जास्तीत जास्त लांबी ९॥ मैल व रुंदी १३ मैल आहे. नगरीच्या भोंवतीं ६०६ फूट रुंदीचा व ३० फूट खोलीचा खंदक आहे. शहराच्या तटास ५७० बुरुज व ५० प्रवेशद्वारे आहेत. । | अभ्यास :--१. प्राचीन इतिहासाची माहिती ग्रीस देशांत सांपडते आणि आपल्याकडे कां सांपडत नाहीं ? २. पोरसला हत्तींचा उपयोग का झाला नाही ? १६ : : सेल्यूकस व चंद्रगुप्त मौर्य [शिकंदराच्या मृत्यूनंतर सेल्यूकस हा आशियांतील ग्रीक साम्राज्याचा मुख्य झाला. त्याचा व चंद्रगुप्ताचा स्नेहसंबंध जडला, त्या काळाला अनुलक्षून पुढील उतारा आहे. याचा मूळ लेखक ऑगस्टस हा रोमन सम्राटांच्या वेळचा (इ. स.१४) आहे. त्याचा उतारा जस्टिन याने आपल्या ग्रंथांत दिला. जस्टिन हा पांचव्या शतकांत होऊन गेला असे मानतात.--दि इंडियन अॅन्टिक्वेरी, व्हॉल्यूम ४, पृ. ११४] मॅसिडोनियाच्या राज्याची विभागणी शिकंदराच्या मृत्यूनंतर झाली. त्यांतील पूर्वेकडील भागांतील राज्यकत्र्यांशी सेल्यूकसने पुष्कळ युद्धे केली. 'प्रथम त्याने बाबिलोनिया जिकले. या विजयाने सामर्थ्य वाढल्याने त्याने बँक्ट्रिया ताब्यांत आणले. त्यानंतर तो हिंदुस्थानापर्यंत पोहोचला. तेथील लोकांनी आपल्या मानेवरील गुलामगिरीचे जू झुगारण्यासाठी, शिकंदरने नेमलेल्या अधिका-यांना ठार केले होते. चंद्रगुप्ताने या देशास स्वतंत्र केले. परंतु विजय मिळतांच स्वातंत्र्याचे रूपांतर त्याने गुलामगिरीत केलें. ज्या लोकांना परकीयांच्या दास्यत्वांतून त्याने मुक्त केले त्यांवरच तो स्वतः जलूम करू लागला. अशा रीतीने राजपद मिळवलेल्या चंद्रगुप्ताच्या आधीन ज्या काळीं हिंदुस्थान होता त्या काळीं सेल्यूकसने चंद्रगुप्ताशी करार केला.