पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/65

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास पूर्वेकडील साम्राज्याची (याप्रमाणे) व्यवस्था लावून अन्टिओकसच्या विरुद्ध उद्भवलेल्या युद्धांत तो गुंतला । अभ्यास :--चंद्रगुप्त मौर्याविषयीं जस्टिनचे मत काय आहे ? हे मत ग्राह्य मानता येईल काय ? 'हो' अगर 'न' कारास कारणे द्या, १७ । । मौर्यकालीन राजाची दिनचर्या [ महाभारतांत राजधर्म प्रकरणांत आणि इतरत्रहि राजनीतिसंबंधी चर्चा आलेली आहे. मनुस्मृति आदि ग्रंथांतहि त्यास महत्त्वाचे स्थान आहे. यानंतरचा परंतु प्राचीन कालचा राजनीतिशास्त्रावरील महत्त्वाचा ग्रंथ म्हटला म्हणजे स्त्रि. पू. ३२५ च्या सुमारास रचिलेला ‘कौटिलीय अर्थशास्त्र' होय. यापूर्वी अर्थशास्त्रावर सतरा ग्रंथकार झाले, असे या पुस्तकांतील उल्लेखावरून दिसते. परंतु ते ग्रंना उपलब्ध नाहींत. या पुस्तकाचा कर्ता कुटिलपुत्र चाणक्य हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी मुख्य सल्लागार होता. तथापि याबद्दल कांहीं विद्वान् शंकित आहेत. गुप्ताच्या पदरचा ग्रीक वकील मेगॅस्थेनीसने या ग्रंथाचा उल्लेख केला नाहीं असा मद्दा त्यांच्याकडून पुढे मांडला जातो. परंतु तो प्रबळ दिसत नाही. कारण मेगॅस्थनीसचे स्वतःचे सर्व लेखन आतां उपलब्ध नाहीं, त्याचे कांहीं त्रुटित उतारे सांपडतात. तेवढ्यावरून असे अनुमान काढणे चूक होय. चंद्रगुप्ताच्या दरबारींच हा कौटिल्य होता हे सप्रमाण सिद्ध करण्याचे कार्य कौटलीय अर्थशास्त्राचे मराठी अनुवादक श्री.ज.स. करंदीकर व रा. हिवरगांवकर यांनी आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केले आहे. या ग्रंथांतूनच अध्याय १९मधून पुढील उतारा घेतला आहे. या ग्रंथांत, गांवें वसविणे (अ. २२) आयुधागाराध्यक्ष, शस्त्रांची नांवें (अ. ३९) विवाहसंबंध इत्यादि अनेक चांगली प्रकरणे आहेत, ती अभ्यासून अवश्य वाचावीत. ] राजा उद्योगी असला म्हणजे चाकरहि उद्योगी होतात. राजाच्या हातून दुर्लक्ष होऊ लागल्यास चाकरहि दुर्लक्ष करतात व राज्याचा विघात करतात ...... :: घटका-पांत्रांच्या साह्याने किंवा सांवली मोजून दिवस व रात्र यांचे आठ आठ भाग करावे...दिवसाच्या पहिल्या भागांत राज्यांतील बंदोबस्ताची