पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/68

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशोकाच्या चौदा आज्ञा ३५ निंदा न करणे किंवा ती अप्रासंगिक तरी न करणे किंवा प्रसंगामुळे करावी लागल्यास थोडी करणे हे होय. । (ङ) परंतु अन्य संप्रदायाचासुद्धा वाजवी सत्कार केलाच पाहिजे. (च) जर एखादा याप्रमाणे आचरण करील तर तो स्वपंथाची । उन्नति करील व परपंथाला उपकृत करील. (छ) परंतु जर एखादा ह्याविरुद्ध वर्तन करील तर तो स्वपंथ नष्ट करून परपंथावर अपकार करील. (ज) जो कोणी आपल्या संप्रदायाची पूजा करतो, आणि परसंप्रदायाची निंदा करतो तो हे सर्व आपल्या संप्रदायावरील भक्तीने करतो. आणि त्यास वाटते की, मी आपला संप्रदाय उद्दीपित केला; तो तर तसे करतांना आपल्या संप्रदायाचाच घात करतो. (झ) तर मग समवाय हीच चांगली गोष्ट आहे. (कां कीं) एकमेकांचे धर्म एकमेकांनी ऐकावेत व मानावेत. (ञ) देवानांप्रियाची इच्छा अशी आहे की, सर्वच संप्रदाय बहुश्रुत आणि कल्याणपर असोत. (ट) जे तेथे (आपल्या मतावर) प्रसन्न आहेत त्यांना असे सांगावयाचें कीं, (ठ) देवानांप्रिय जितका सर्व मतांच्या मूलभूत तत्त्वांच्या पुरस्कारास (सारवृद्धीस) मान देतो तितका दान किंवा पूजा यांस मान देत नाहीं. (ड) या कामासाठीं पुष्कळच (अधिकारी) आहेत. धर्मासाठी महामात्र, स्त्रियांवरील महामात्र, व्रजांचे तपासनीस व इतर अधिकारी (निकाय). (ढ) आणि याचे फळ असे आहे की, याच्या योगाने स्वत:च्या संप्रदायाची वृद्धि होते आणि धर्माचे दीपन होते. । अभ्यास :--विरुद्ध मताच्या लोकांशी कसे वागावे, असे अशोकानें सांगितले आहे? असे वागण्याने आपल्या पंथाचा तोटा होतो काय ? [शासन १२ वें]