पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/75

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ हिदुस्थानचा साधनरूप इतिहास २२ : पहिल्या शतकातील गणित भूर्जपत्रावर नफ्यातोट्याची उदाहरणे [ पेशावर जिल्ह्यांतील मार्दन (Marden) तालुक्यांत बक्षाली गांवीं जीर्ण भूर्जपत्रे सांपडली. मार्दन ते बक्षाली रस्त्याच्या कडेस एके ठिकाणीं कांहीं मातीची टेकाडे आहेत. तेथे एक गांव होतें तें उध्वस्त झाले. य पैकी एका टेकडींतील दगड काढीत असतांना हीं भूर्जपत्रे सांपडली. त्या ठिकाणी तिकोनी दगड (Diva), काळ्या मातीचा एक लोटा इत्यादि वस्तू सांपडल्या. तेथून हीं भूर्जपत्रे हलविण्यांत आली. ही हलवाहलव करतांना भूर्जपत्रे खराब झाली. भूर्जपत्रांवर शारदा लिपींत हे लेखन केलेले आहे. अशी ७० पृष्ठे सांपडली. पुष्कळ जागी तीं जीर्ण झालेली आहेत. तरीसुद्धां में वाचता येत आहे त्यावरून चांगली माहिती मिळते. सध्या ती पत्रे ऑक्सफर्ड येथील बोडियन (Bodian Library) ग्रंथालयांत आहेत. G. R. Kaye यांनी त्यांचे प्रथम संपादन केले. त्यांच्या प्ते याचा लेखनकाल १२ वें शतक असावा. हे मत पूर्वग्रहदूषित असून चुकीचे अहे असे प्रा. गुर्जर यांना वाटते. लेखनाची भाषा (संस्कृत-प्राकृत मिश्र), दिनार आणि द्राम (dramma) या नाण्यांचा उल्लेख, + या चिन्हाचा उणे दाखविण्यास उपयोग, घनमूळ काढण्याच्या पद्धतीचा अनुल्लेख इत्यादींवरून या भूर्जपत्रांचा लेखनकाल खि. पू. २०० ते इ. स. २०० पर्यन्त ठरतो, असे प्रा. गुर्जर यांनी सिद्ध केले आहे. (Ancient Indian Mathematics, & Vedha by Prof. L. V. Gurjar पृ. ४९-६० पहा.) | या लेखामध्ये त्रैराशिक, नफातोटा, सोन्यांतील हिणकसपणा कोढण्याची रीत, ५ अव्यक्ते असलेली रेखात्मक समीकरणे, वर्गसमीकरणें । वर्गमूळ, गणितश्रेणी, मिश्रश्रणी, वर्गक टटे इन्यादि प्रकारची उदाहरणे आहेत. त्यांतून पुढे एक उदाहरण दिले आहे.] (Verse 6r ) सूत्रम् ।। (विक्र) येन क्रय भाज्यं रूपहीनं पुनर्भजेत् ।। (लाभेन) युणयेत्तत्र नीवी भवति नत्रच ।।। उदा. ॥ द्विभिः क्रिणात यस्सप्त विक्रिणाति त्रिभिषट् । अष्टादश भवेल्लाभ का (नीवी तत्र) कथ्यताम् ।।