पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/80

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सम्प्राट्, समुद्रगुप्ताचा पराक्रम ४७ (तस्य समुद्रगुप्तस्य) समुद्रगुप्ताचें कीतिगान हा स्तंभ करतो असे अखेरीस म्हटले आहे. अर्थ चदिशीं लक्षांत यावा म्हणून भाषांतरांत या विशेषण वाक्यांच्या जागी शुद्ध वाक्ये दिली असून 'समुद्रगुप्ताने । अमुक अमुक केले असे लिहिले आहे. ] ..राजसभेतील सभासद उत्सुक झाले आहेत, अशा स्थितीत पित्याचे अंतःकरण भरून आलें, कानावरचे केस उभे झाले, आणि डोळ्यांत अश्रू डबडबून आले. प्रेमभराने व्याकुळ होऊन त्याने (आपल्या अनेक पुत्रांपैकी केवळ) समुद्रगुप्ताकडे दृष्टि फेकली, आणि त्यास आलिंगन देऊन तो म्हणाला, “तंच योग्य आहेस, तूच या समस्त भूमीचे पालन कर. .............. (म्हणून) चंद्राप्रमाणे त्याची कीर्ति दूरवर पसरलेली आहे. वस्तूच्या मूलगामी तत्त्वाचे भेदन करणारे ज्ञान, सद्गुणी लोकांच्या मार्गावर अधिष्ठित, कवित्वाला आदर्श असणारे काव्य करणे आदि गुण त्याच्याजवळ आहेत. असा कोणता गुण आहे कीं जो त्याच्याजवळ नाहीं ? गुणवान् विद्वानांचे ध्यानस्थान तो एकमात्र आहे. ......तो शंभर प्रकारची युद्ध करण्यांत कुशल (असून) ‘स्वभुजपराक्रम हाच त्याचा सहाय्यक आहे. पराक्रम हेच त्याचे वैशिष्ट्य. त्याच्या शरीरावर परशु, बाण, भाले, शक्ति, प्रास, तलवार, तोमर, भिदिपाल,......वैतस्तिका आदि शस्त्रांनी शंभर व्रण झाल्याने ते (शरीर) अधिक शोभिवंत दिसते. .....दक्षिणापथांतील (पुढील) राज्ये जिंकल्याने, (कांहीं) राजे बदलल्याने अथवा (पूर्वीच्यावर) कृप दृष्टि ठेवल्याने त्याच्या प्रतापाची कीर्ति वाढली आहे. कोसल (सिरपुर मध्यप्रांत) देशाचा महेन्द्र, महाकांतारचा व्याघ्रराज, केरळचा मण्टराज, पैष्टपुरचा महेन्द्र,गिरिकुट्टरचा स्वामिदत्त, एरण्डपल्लचा दमन, कांचीचा विष्णुगुप्त, अवमुक्तचा नीलराज, वेंगीचा (एलोर तालुक्यांतील वागी किंवा. पेशवागी) हस्तिवर्मा, पालक्काचा उग्रसेन, देवराष्ट्राचा कुबेर, कौस्थलपुरचा धनंजय प्रभृति. रुद्रदेव, मतिल, नागदत्त, चन्द्रवर्मा, गणपतिनाग, नागसेन, अच्युत, नन्दिन्, बलिवर्मा, अदि आर्यावर्तातील पुष्कळ राजांचा त्वरेने पराभव केल्याने त्याचे सामर्थ्य वाढले आहे; अरण्यराज्यावर त्याने स्वामित्व प्रस्थापिलें आहे. | १ छत्तीसगढ संस्थाने, २ पीठपुरम् , (जि. गोदावरी, मद्रास इलाखा) ३ महाराष्ट्र किंवा देवगिरी. (पुढील पृष्ठावर चालू)