पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/81

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास सीमेवरील समतट, डबाक” कामरुप नेपाळ, कर्तपुर ६ आदि आणि माढव' अर्जुनायन यौधेय' माद्रक० अभीर, प्रार्जुन ११ सनकानीक , काक, खरपरीक आदि राज्ये करभार देऊन, नजरणे देऊन आणि आज्ञापालन करून त्याच्या सम्राटपदास मान देतात. पूर्वी ज्यांना घालवून दिले अशा अनेक राजवंशाची प्रतिष्ठापना त्याने केली आहे. देवपुत्र, शाही २ शाहानुशाहि शक, मुरुण्ड अणि सिंहल आदि द्वीपस्थ लोकांनी त्याच्याकडे आत्मसमर्पण, कन्य, दान, उपायन (नजराणे) दिली, आणि गरुडमुद्रांकित प्रार्थनापत्रांतून ‘आमच्या प्रदेशाचे शरान करण्यास संमती द्या' अशी याचना केली. (ती त्याने मान्य केली )..... ..........तो दीनांचा कनवाळू आणि पीडितांचा उद्धारकर्ता .....आहे. | देवगुरु बृहस्पतीला त्याने आपल्या तीक्ष्ण आणि विदग्धबुद्धीनें (तसेच) तुंवर आणि नारदांना गांधर्वलालित्याने लाजविले आहे. । विद्वानांनीं चिंतन करावे अशी काव्यरचना केल्याने ‘कविराज' ही उपाधि त्याने सार्थ केली आहे. .. श्रीगुप्तांचा नातू घटोत्कच, त्यांचा नातू श्रीचंद्रगुप्त अ.णि लिच्छवीचे दौहित्र महादेवी कुमारदेव यांचा, महाराज श्रीसमुद्रगुप्त, हा पुत्र होय. ...... या नरेशाचा संधिविग्रहिक, कुमारामात्य आणि महादंडनायक हरिषेण याने रवलेले हे काव्य भूतमात्रांचे कल्याण करण्यास उपयोगी होवो. अभ्यास :--१. राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांपैकीं राजपदावर कोणी यावे याविषयींची गुप्तकालोन पद्धति कोणती अभावी हैं प्रथम परिच्छेद वाचून सांगा. २. समुद्रगुप्ताच्या अंगीं कोणते गुण होते असे या लेखांत सांगितले आहे? ३. प्राचीन कालीन शस्त्रास्त्रांची नांवें प्रस्तुत लेखांत आहेत. तत्कालीन प्रमुख शस्त्रांची नि आधुनिक शस्त्रांची यादी तयार करा. ४. शस्त्रांच्या जखमांनी वीर पुरुषास शोभा येते हा विचार तुम्हांस कितपत पटतो ? ५. समुद्रगुप्तकालीन विविध देशांची नांवें एकत्र करून त्यांतील आजहि सहज ओळखता येतील अशा नांवाखाली रेघ ओढा, अर भारताचा नकाशा काढून ते प्रदेश त्यांत दाखवा ६. समुद्रगुप्ताच्या राज्याच्या सीमा कोणत्या ? ४ डाक्का, ५ आसाम, ६ कर्तारपूर, जालंदर जिल्हा ७ माळवा, ८जयपूर, अलवार, ९ सतलज-यमुनेमधील प्रदेश १० सियालकोट ११ नरसिंहपूर(मध्यप्रांत), १२ काबूल नदीचे खोरे नि पंजाब या भागाचे राजे