पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/82

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुस-या चंद्रगुप्ताच्या राज्यांतील लोकांची राहणी । ४१ २६ : दुसन्या चंद्रगुप्ताच्या राज्यांतील लोकांची राहणी [ भारतवर्षात बौद्धधर्माचा अभ्यास करण्यासाठी अनेक कष्ट सोसून * चिनी यात्रेकरू प्राचीन काळी येत. अशांपैकीं फा-हैन हा या देशांत इ. स. ३९९-४१४ पर्यंत प्रवास करीत होता. त्याने स्वदेशी गेल्यावर, आपले प्रवासवर्णन लिहिले. त्याचे इंग्रजी भाषांतर जेम्स लेग (Legge) कृत' फार्हन्स ट्रॅव्हल्स इन इंडिया अँड सीलोन,' या नांवाने प्रसिद्ध आहे. त्यांतील पृ.४२-४३वरील उता-याचा मराठी अनुवाद पुढे दिला आहे प्रस्तुतचे वर्णन दुस-या चंद्रगुप्ताच्या वेळचे म्हणजे समुद्रगुप्ताच्या मुलाच्या वेळचे आहे. याच्याच कारकीर्दीत गुप्तसाम्राज्य पश्चिम समुद्रापर्यंत वाढलें, आणि याच्याच काळीं हूण टोळ्यांचा उपद्रव भारताला पोहोंचू लागला.] ..येथून दक्षिणेकडील प्रदेशास मध्यराज्य असे नांव आहे. या ठिकाणी थंडी आणि उष्णताहि समप्रमाणांत आहेत. येथे बर्फहि पडत नाहीं अथवा धुकेंहि नसते. लोकसंख्या पुष्कळ आहे पण ती सुखी आहे. लोकांना आपल्या घराण्यांची नोंद करावी लागत नाहीं, किंवा न्यायाधीशा(मॅजिस्ट्रेट) पुढे उपस्थित व्हावे लागत नाही. राजाच्या जमिनी जे कसतात त्यांना आपल्या नफ्याचा कांहीं अंश राजास द्यावा लागतो::::::फांशी किवा इतर शारीरिक शिक्षा न देतां राजा राज्य करतो. अपराध्यांना परिस्थितीप्रमाणे कमी किंवा अधिक प्रमाणांत दंड केला जातो. पुनः पुनः बंड केलेल्यांना सुद्धा त्यांचा उजवा हात कापणे एवढीच शिक्षा केली जाते. राजसंरक्षक आणि सेवक यांना पगार दिला जातो. सबंध देशभर लोक कोणत्याहि प्राण्याची हत्या करीत नाहीत, मादक दारू पीत नाहीत; आणि कांदे किंवा लसूणहि खातं नाहींत. याला अपवाद म्हणजे फक्त चांडाळांचा. हे चांडाळ म्हणजे दुष्ट लोक, ते इतरांपासून दूर राहतात. ते जेव्हां शहरांत किंवा बाजारांत प्रवेश करतात; तेव्हां एक लांकडी काठी वाजवून आपण येत असल्याचे सूचित करतात. त्यामुळे लोक त्यांना टाळतात. त्यांच्याशी जनतेचा संपर्क येत नाही. या प्रदेशांत लोक डुकरें आणि कोंबड्या पाळीत नाहींत, जिवंत जनावरे विकीत नाहीत; बाजारांत खाटिकांची दुकानें नाहींत किंवा मादक पेयाचे व्यापारी नाहीत, वस्त च्या खरेदी विक्रीसाठी ते कवड्यांचा उपयोग करतात. केवळ चांडाळ हे कोळयाचा नि शिका-याचा धंदा करतात व मांस विकतात. ४ सा. इ.