पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/84

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कलिग देशाचा राजा पराक्रमी श्रीखारवेल ५१ युवराजपद भोगिता झाला, आणि चोवीस वर्षे पूर्ण होतांच ज्याने आपल्या वाढत्या तारुण्यांत वेनराजासारखें जय संपादन चालविले होते अशा त्यास ओळ तिसरी ••••••••महाराज्याभिषेक झाला. ओळ चवथी दुस-याच वर्षी शातकर्णीला न जुमानतां त्याने पश्चिम दिशेकडे हय, गज, नर, रथइत्यादि बरेंच सैन्य पाठविले. आणि कृष्णवेण्णेकडे गेलेल्या सेनेने मूषिक नगरीचा नाश केला. ओळ सहावी पांचव्या वर्षी, नंदाने तीनशे वर्षांपूर्वी खणलेला कालवा तनसुलिय रस्त्यापासून..त्याने राजधानोंत आणला. सहाव्या वर्षी..अभिषिक्त झाल्यावर - ओळ सातवी सर्व दु:खितांना आपले साहाय्य देऊन शतावधि, सहस्रावधि अशा पौरांवर आणि जानपदावर त्याने अनेक अनुग्रह केले. आणि आठव्या वर्षी आपल्या मोठ्या सेनेने जिचे मोठे तट आहेत अशा गोरगिरीचा •••••• ओळ आठवी | नाश करून राजगह-राजाला पीडा करता झाला की जो खारवेलाच्या आगमनाची वार्ता ऐकताच आपले सर्व सैन्य आणि सैन्यवाहिनी सोडून..... मथुरेला चालता झाला. ओळ बारावी •••मगधाचा राजा बृहस्पतिमित्र याला पदवंदन करावयास लाविलें. ओळ तेरावी पांड्य राजापासून घोडे, हत्ती, रत्ने आणि माणिकें इत्यादि शेकडो मुक्तामणि रत्ने त्याने हरण केली. १. हा राजा शालिवाहन शातकर्णी होय. (पं. जयचंद विद्यालंकार) २. पौर आणि जानपद ही शहराची आणि गांवांचीं अधिकारी मंडले होत. यांना अधिकार देऊन अनुगृहीत केले असा अर्थ. (जयस्वाल). ३. बर्धन टेकडी (बेगलर) ४. मगधाची अतिप्राचीन राजधानी-तेथील राजाला