पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/89

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास . ज्याचा सर्व जातींच्या लोकांनी आश्रय घेतला होता, ज्याने रणांगणाखेरीज इतरत्र मनुष्याची हत्या करावयाची नाहीं अशी प्रतिज्ञा करून । ती पाळली, ज्याने प्रतिपक्षावर ठीक हल्ले चढविण्यास कधी कमी केलें नाही, पण ज्याने शरणागतांस अभयच दिलें, जो पूर्वपश्चिम भागांतील अकरावंती, अनुपप्रदेश, आनर्त, सौराष्ट्र, ३वभ्र, मरु, कच्छ, सिंधुसौवीर, ककुर, अपरान्त आणि निषाद, हे प्रदेश जिंकून त्याचा स्वामी झालेला होता, ज्याच्या राज्यांतील खेडीं, शहरे व बाजारवरती यांना कधीं चोराचिलटांचा, सर्पश्वापदांचा किंवा रोगराईचा उपद्रव झाला नाही, ज्यावर सर्व प्रजा अनुरक्त होती, ज्याने युधेयांशी लढाई करून त्यांना शरण आणले, ज्याने दक्षिणपथाचा शातकर्णी राजा याचा उघड युद्धांत दोनदां पराभव करूनहि, तो निकट संबंध असल्याने त्याचा नाश केला नाहीं व या उदारपणामुळे ज्यांची कीति सर्वत्र पसरली, ज्याने पदच्युत राजांना पुनः सिंहासनावर बसविलें, जो यथार्थ हस्तामुळे, (दानामुळे) धर्माला प्रिय झाला आहे, ज्याने व्याकरण, संगीत, तर्क इत्यादि शास्त्रांवर प्रभुत्व मिळविले आहे, ज्याने ह्य, गज, रथ, खड्ग, ढाल इत्यादींचा वापर करण्यांत व द्वंद्वयुद्धांत प्रावीण्य मिळविले आहे, ज्याने दानधर्मामुळे कीत मिळविली आहे, अनेक ठिकाणच्या खंडण्या व जकाती आल्यामुळे ज्याचा खजिना तुडुंब भरलेला आहे, ज्याने सभासमयाला उचित अशा गद्यपद्याची अलंकार लालित्यपूर्ण रचना करण्यांत कौशल्य संपादन केले आहे, ज्याची स्थिति, गति, आकृति, उंची, शक्ति, उत्साह, भाषण इत्यादि त्यास शोभादायक झाली आहेत, ज्याने महाक्षत्रप असे नाव स्वतः मिळविले आहे. देशोदेशींच्या राजकन्यांच्या स्वयंवरप्रसंगी ज्याच्या गळ्यांत पृष्पमाला येऊन पडल्या आहेत, अशा रुद्रदामनाने हजार वर्षापर्यंत गायी ब्राह्मणांचे रक्षण व्हावे, स्वतःचे पुण्य व कीति वाढवावी या हेतूने पूर्वीच्या तिप्पट लांबीरुंदीचा, बळकटीचा व दिसण्यांत भव्य व सुंदर असा बंधारा थोडक्या वेळांत बांधविला व असे करतांना प्रजेवर कराचा त्रासदायक बोजा पडणार नाही व प्रजेपैकी कुणालाच वेठबिगार करावी लागणार नाही याची दक्षता घेतली. पहिल्या प्रथम एवढे मोठे काम कसे पारं पडेल याची चिंता वाटून रुद्रदामनच्या प्रधानांनी त्यास विरोध केला व आतां तलाव कसंचा बांधला जातो या विचाराने प्रजा शोकग्रस्त झाली,