पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/91

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास पोरका झाला. लहानपणीं बाण फार हूड होता. त्याने पुष्कळ पर्यटन केले. या फिरस्त्याच्या आयुष्यात त्याला ज्ञान व अनुभव हीं मिळाली. जेव्हां तो पुन्हां ब्राह्मणाधिवास (प्रीतिकूट) येथे परत आला, तकट) येथे परत आला, तेव्हां हर्ष राजाचा भाऊ कृष्णराज (बहुधा चुलतभाऊ) याकडून बोलावणे घेऊन एक दूत त्याच्याकडे आला. बाणासंबंधीं हर्षाचे मन पूर्वग्रहदूषित होते, तरी बाणाने अजिरावती येथे हर्षाची भेट घेतली. कालांतराने हर्षाने बाणावर मोठा कृपाप्रसाद केला. यामुळ वाणावर 'श्री'ची कृपा झाली. सरस्वतीची कृपा त्यावर होतीच. बाणाने ‘हर्षचरित' व 'कादंबरी' हे दोन ग्रंथ लिहिले. पण ते दोन्ही अपुरे ठेवून त्याने इहलोक सोडला. भूषण नांवाच्या त्याच्या मुलाने एक वर्षाच्या आंत कादंबरी' हा ग्रंथ पुरा केला. चिनी प्रवासी ह्युएन-त्संग किंवा युवान च्वांग हिंदुस्थानांत ६२९ ते ६४५ या काळांत आला होता. त्याने लिहिलेलें हर्षाचे वर्णन व बाणाने केलेले वर्णन हीं एकमेकांस पूरक आहेत. बाणाच्या लेखनांत व्यक्तिदर्शन आहे, तर हयूएन-त्संग हा तत्कालीन परिस्थितीवर विशेष प्रकाश पाडतो. हर्षाचा जन्म इ. स. ५९० त झाला. इ. स. ६०६ मध्ये तो सर्व उत्तर भारताचा अधिपति झाला. ६४७ मध्ये हर्षाचा मृत्यू झाला. बाणाचा काळ सातव्या शतकाच्या पूर्वार्धात येतो. पुढील उतारा हर्षचरितांतील सप्तम उच्छ्वासांतील आहे.] । | घोड्यावर बसून कपडे मलिन झालेल्या स्थितीत भण्डी इतर कुलपुत्रांना बरोबर घेऊन राजवाड्याच्या दाराशीं आला आणि घोड्यावरून उतरून खाली मान घालून राजवाड्यांत शिरला. राजा दिसतांच दुरूनच रडत रडत राजाच्या पायां पडला. । राजा हर्षाने त्याला उठवलें व गाढ आलिंगन दिलें. (नंतर) फार कालपर्यंत तो धाय मोकलून रडला. थोडा दु:खभार हलका झाल्यावर तो पुन्हा आपल्या आसनावर बसला. भण्डीने तोंड धुतल्यावर राजाने तोंड धुतलें. थोडा वेळ गेल्यावर भावाच्या मृत्यूची हकीकत त्याने विचारली. भण्डीने जशी घडली तशी सर्व हकीकत सांगितली. नंतर राजा पुन्हा म्हणाला, ‘राज्यश्रीसंबंधींची हकीकत काय? त्यावर भण्डी सांगू लागला, “महाराज राजा राज्यवर्धन देवलोकाप्रत गेल्यावर गुप्त नांवाच्या (राजानें) कुशस्थळ