पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/95

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास कुटुंब नियमीतपणे शेकडों मण भात व मोठ्या प्रमाणावर लोणी व दूध यांचा या मठाला पुरवठा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना चरितार्थासाठीं कोणापाशीं कसलीहि याचना करावी लागत नाही. त्यांच्या सर्व गरजा अनायासे भागतात. येथील लोकांची अभ्यासांतील प्रगति व यश यांचे बव्हंशीं श्रेय राजाच्या औदार्याला आहे. अभ्यास :-१. नालन्दा म्हणजे काय ? २. कोणत्या शास्त्रांचा अभ्यास या विद्यापीठांत होत असे ? ३. या विद्यापीठांत शिकण्यास येण्याची मुख्य कारणे सांगा. ४. विद्यापीठांचा खर्च कसा चालत असे ? उदार नृपति हर्ष ३२ । । । । [प्रस्तुतचा लेख एकाच १९x१३' या आकाराच्या तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला आहे. शहाजहानपूरपासून ४५ मैलांवरील बाणसखेडा येथे हा ताम्रलेख खिस्ताब्द १८९४ मध्ये सांपडला. सध्यां लखनौच्या प्रांतिक प्रदशनीत तो सुरक्षित आहे. सम्राट हर्षाने वर्धमान् कोटीतळावरून हे दानपत्र काढले. त्यांत मर्कटसागर या गांवाचे (अंग विषयांतील व पश्चिम पथांतील) दान दोन ब्राह्मणांना केलेले आहे. संवत २२ म्हणजे हर्ष राजा राज्यावर आल्यापासूनचे २२ वें वर्ष, म्हणजे खिस्तवर्ष ६२८ होय. शेवटों दिलेली राजाची स्वाक्षरी हुबेहूब खोदली असावी असे दिसते. लेख कोणी जुळविला त्याचे नांव त्यांत नाहीं. वाणाच्या समकालीन तो असल्याने लांबच लांब समासांनी युक्त असा हा लेख आहे यांत आश्चर्य नाहीं. शेवटच्या दोन ओळी हर्षाने रचिलेल्या असाव्या. । प्रस्तुतचा अनुवाद, हा 'संस्कृत इन्स्क्रिप्शन्स भाग १, संपादक. श्री.डी. बी.डिकसळकर,या पुस्तकांतील उतारा नं.११च्या आधारे केला आहे.] --उतारा पुढील पृष्ठावर पहा-- अभ्यास :-- १. ‘हर्ष हा दानशूर होता' असे दर्शविणारी या लेखांतील घाक्ये सांगा. श्रीमंतीचे लक्षण त्यांच्या मते कोणते ? २ हर्षास मातापित्याप्रमाणे वडील बंधु वंदनीय कां वाटे ? ३ तत्कालीन आर्याचा आदर्श कोणता होता हे तीनचार वाक्यांत सांगा.