या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार
सुधारलेला देश आहे काय ? किंवा अशा अपराधांची चौकशी करणें व त्यांबद्दल योग्य दंड करणें हें सरकारचं कर्तव्य नाहीं, असें प्रतिपादणारे ' थंड सुधारक ' कोणत्याहि सुधारलेल्या देशांत असतील काय? असतील असें आम्हांस वाटत नाहीं. उलट आमची अशी समजूत आहे कीं, कोण- त्याहि देशांत जो जो अधिकाधिक सुधारणा होत जाते तो तों त्यांतील लोकांच्या अंगों अधिकाधिक सूक्ष्मवेदित्व किंवा शीघ्रग्राहित्व येत जातें व त्यामुळे त्यांचा एकमेकांपासून एकमेकांस जितका कमी त्रास होईल तितका होऊं देण्यासाठी व प्रत्येकास अधिकाधिक स्वातंत्र्याचा उपभोग मिळण्या- साठीं, प्रतिदिवशीं नवीन नवीन गोष्टींत सरकारचें साहाय्य घेऊन, कायद्यां- ची संख्या वाढविण्याचा आणि त्याप्रमाणें न्याय देण्यासाठी न्यायाधिशांचें काम अधिकाधिक कठिण करण्याचा क्रम एकसारखा चालू आहे अशा प्रकारच्या बाह्य बंधनांनीं मनुष्यांच्या अंतःकरणांतील दुष्प्रवृत्तींचा मोड हळू- इळू होत जाऊन, त्यांचें बहुतेक वर्तन सहजगत्या नातिसंमत किंवा न्याया- नुसारी होऊं लागल्याशिवाय या क्रमास खळ पडणार नाहीं । असें वाटतें. समाज हा स्वाभाविकपणे ज्यास अनेक पैलू आहेत अशा खड्यासारखा आहे. असला खडा खाणींतून नुकताच काढला असल्यास, विशिष्ट आकार, सफाई किंवा तेज यांपैकीं कोणतेच गुण त्यांत नसतात, पण कल्पक सुवर्ण- कारांकडून जसजसें त्यावर घर्षण होत जाते तसतसें त्यास मोहक स्वरूप येत जाते. देशांतील विचारी लोक हे कल्पक सुवर्णकार होत व समाज हा त्यांच्या हातीं दिलेला पैलूदार खडा होय. या खड्यावर सरकारी साहाय्य, स्वत:चा प्रयत्न वगैरे हत्यारांनी काम करून ते त्यास मोहकपणा आणितात, ज्या कामास ज्या वेळीं जें हत्यार पाहिजे असेल तें घेतलें पाहिजे. आज मित्तीस आमच्या समाजाची अशी दीनवाणी स्थिति झाली आहे कीं, प्रत्येक गोष्टींत आमच्या मनांत असो किंवा नसो, थोडेबहुत सरकारचें साहाय्य घेतल्या- शिवाय आमच्या हातून कांहीं एक होत नाहीं. कोणी लोकशिक्षणाचा पैलू घासून वाटोळा करण्यासाठी सरकारची मदत मागतात ! कोणी सदगुणांच्या पैलूवरील मदिरादि व्यसनांचा मळ उडविण्यासाठीं तेंच करतात आम्ही आमच्याकडे घेतलेल्या पैलूस इतर पैलूंप्रमाणे चांगला आकार व सफाई आणण्यासाठीं तेंच करीत आर्हो ! सबब आम्हीं मात्र तें काम सद्यःस्थितीत