या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८३

पांचजन्याचा हंगाम

घालून निमूटपणें जावें लागावें, येवढ्यानेंच या आचाराची परमावधि होती, तर याकरितां आम्ही एका आर्टिकलाची जागा आडविली नसती. पण तसें नाहीं. माघी पौर्णिमेपासून जसजसे अधिकाधिक दिवस लोग्त जातात तसतसे अधिकाधिक वयाचे लोक या प्रतिसांवत्सरिक बीभत्सपणाचे भागीदार होऊं लागतात; अखेरीस फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला प्रत्येक हिंदु- गृहांत हुताशनीची पूजा होऊन तिच्याभोवती प्रदक्षिणा घालतांना हें अनं- गल फाल्गुनवाद्य गृहाधिपतीकडून घरांतील बायकांच्या, मुलींच्या व मुलांच्या समक्ष यथाशास्त्र वाजविलें जातें ! तसेंच या तिथीला गांवांतील मोठमोठया देवळांपुढे किंवा चवाठ्यांच्या जागांवर रचलेल्या सार्वजनिक होळ्यांस संध्याकाळी गांवांतील मानकऱ्यांकडून अग्नि देववून त्यांच्या सभोवती या अत्यंत शुभसूचक मुखवाद्याचा गजर करण्याची रीत आहे !
 या उत्सवाचा येथेंच शेवट होता तरीदेखील फार चांगलें झालें असतें; पण आमचे हिंदु लोक धर्माला खूप राखण्याविषयीं फार उत्कंठ असल्या- मुळे या राक्षसी, पैशाचिक, किंवा रानटी देवीचा ते पूर्ण पांच दिवस मोठ्या थाटाचा उत्सव करतात ! तमाशांच्या छकडी, वेश्यांची गाणी, रंगाची शिंपणी - यासंबंधाचा अप्रशस्तपणा असावा त्याहून वाईट आहे; पण कित्येक ठिकाणी धुळवडीच्या दिवशीं जो समारंभ होतो त्यापुढें हा अप्रशस्तपणा सूर्यापुढे काजव्यासारखा फिक्का पडतो ! लहानमोठे गृहस्थ होळीच्या राखेंत माती, शेण व त्याहूनहि घाण अशीं द्रव्ये मिसळून तयार केलेल्या खातेऱ्यांच्या पंचामृताने आपापली अंगें नखशिखांत ' मावून घेतात व 'टेंपरवारी ' वराहस्वरूप कित्येक मोठ्या हौसेने धारण करतात. नंतर एखादें चावरें, लाथरें व नाळ लागलेलें गाढव हुडकून काढून त्यावर पिछाडीकडे तोंड करून या सोंगापैकीं एक सोंग स्वार होतें. खराटे, केरसुण्याचे बुग्खंडे, फाटकीं शिपतरें व सुपें वगैरे जिनसांचीं छत्रचामरें सज्ज झाल्यावर गांवांतली सगळी टारगी पोरें व तमाशेवाल्यांचा एखादा संच बरोबर घेऊन मोठ्या प्रेमानें विचकट लावण्या म्हणत, नानाप्रकारचे उखाणे म्हणत, नवीन मनुष्य दिसला कीं, त्याच्या अंगावर खातेरें शिंपून व त्याच्या वस्त्रांवर घाणेरडे छाप ठोकून त्याला सामान्य घोळक्यांत ओढून घेत, व ठिकठिकाणी उभे राहून जाणाऱ्या येणाऱ्या बायकांच्या किंवा या