या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कवि, काव्य, काव्यरति

 कवि जें सत्य सांगतो, तें शास्त्रीय सत्याप्रमाणें गूढ नसतें. शास्त्रीय सत्यां- पैकीं कांहीं सत्यें इतकीं गूढ असतात कीं, तीं समजण्यास तपांच्या अध्यय- नाची आवश्यकता असते. तसेंच शास्त्रांत कधीं कधीं विशेष कारणासाठी अगदीं क्षुल्लक सत्यें सांगितलेलीं असतात. या दोन्हीहि सत्यांचा काव्यांत उपयोग होत नाहीं. ' उष्णता, प्रकाश, व विद्युत् ह्रीं गतीचीं निरनिराळीं रूपें होत. ' हैं सत्य काव्यविषय होण्यास आणखी शेकडो वर्षे लोटलीं पाहिजेत. तस्बेंच, ' बाभळीला काटे असतात, मासे समुद्रांत राहतात, ' पावट्याची उसळ फार खाल्लयानें अपचन होऊन वायु सरतो, ' असलीं सत्येंहि काव्याच्या कामाचीं नाहींत ! काव्यांत जीं सत्यें गोंवायाची, त्यांची योग्य निवड करण्यास कवीस पराकाष्ठेचे श्रम पडतात. जीं समजण्यास मुळींच श्रमं पडत नाहींत, अशी उपयोगी नाहीत; जी समजण्यास फार श्रम पडतात, अर्शीहि उपयोगी नाहीत. तीं या दोहोंच्या दरम्यान असून, अनुकूल संवे- दनोत्पादक असली पाहिजेत. यावर कोणी अशी शंका घेतील कीं, काव्यांत वर्णिलेलीं सत्यें नेहमी अनुकूल संवेदनोत्पादक असली पाहिजेत, हें मत खरें असेल, तर काव्यांत दुःखपर्यवसायी नाटकांचा, किंवा अवर्षणादि अरिष्टांच्या वर्णनांचा समावेश कधींच करतां येणार नाहीं. कारण दुःखपर्यवसायी नाटके पाहिल्यानें व अरिष्टांची वर्णनें वाचल्याने मनास आनंद न होतां उलट दुःख होतें, कांहीं अंशी शंका बरोबर आहे; पण थोड्या विचाराअंतीं तिचें निरसन यासारखे आहे. दुष्काळांत अन्न न मिळाल्यामुळे होणाऱ्या यातनांचा प्रत्यक्ष अनुभव आणि त्या यातनांच्या वर्णनाचें वाचन किंवा श्रवण, कामजनास होणाऱ्या क्लेशांचा प्रत्यक्ष अनुभव, आणि त्यांच्या क्लेशांच्या वर्णनाचें वाचन किंवा श्रवण, या आणि याप्रमाणे इतर सर्व गोष्टींपासून होणाऱ्या सुखदुःखांचा प्रत्यक्ष अनुभव आणि त्यांच्या वर्णनांचें वाचन किंवा श्रवण, यांत फार अंतर आहे. प्रत्यक्षानुभवाची तीव्रता वाचनांत किंवा श्रवणांत कधींहि येऊ शकणार नाहीं; आणि तसें होऊं लागलें तर प्रतिकूल संवेदनोत्पादक का कोणी हात