या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

१००

तऱ्हेचे रोग वाढत चालले आहेत; रोग आणि उपासमार यांच्यामुळे आम्ही व्यथित होऊन आमच्या तोंडावर अवकळा येत चालली आहे; आणि प्रतिवर्षी रक्तपितीसारख्या महारोगग्रस्तांची व इतर जातीच्या रोग्यांची संख्या वाढत जाऊन, त्याच प्रमाणानें मृत्युसंख्याहि वाढत चालली आहे. इंग्लिश लोक या भयंकर स्थितीच्या संबंधानें येथून पुढे पूर्ववत् डोळेझांक करतील तर उभय देशांवरहि मोठ्या संकटाचा प्रसंग गुदरून त्यामुळे उभय देशां- तील लोकांचेहि अज्ञातपूर्व नुकसान होणार आहे ! ज्याप्रमाणे झाडाच्या वारदोन फांद्यांवर थोडीशी टवटवीत पालवी, व दापांच फळें दृष्टीस पड- जात; पण बारकाईनें त्याकडे पाहिलें तर बुडख्यापासून शेंड्यापर्यंत तें किड्यांनीं गेवरून टाकिलें आहे, व थोड्याशा जोराच्या वाऱ्याने एकदम भोडून पडण्या- सारखे झालेले दिसतें, त्याप्रमाणें या देशाची अवस्था झाली आहे. मुंबई, कलकत्ता किंवा मद्रास यांच्यासारख्या दहापांच टवटवीत शहरांवरून, किंवा लाख दोन लाखांत जो एखादा दुसरा खरा सुखवस्तु इसम दृष्टीस पडतो त्यावरून, चहूंकडे तशीच आबादानी असेल असें अनुमान करणें हा शुद्ध भ्रम होय. सर रिचर्ड टेंपलसारखे जे गृहस्थ जाणूनबुजून इंग्लिश पार्लमेंटास व इंग्लिश लोकांस या मिथ्या भ्रमांत पाडीत आहेत, ते इंग्लंडचें अपरिमित नुकसान करीत आहेत, व या त्यांच्या अपराधाबद्दल उभय लोकांस भारी दंड द्यावा लागणार आहे. तेव्हां हा प्रसंग टाळण्यासाठी आम्ही आपली खरी स्थिति इंग्लिश लोकांच्या नजरेस आणणें हें जितकें आमचें कर्तव्य आहे, तितकेंच इंग्लंडचें खरें हित चिंत- णाऱ्या आंग्लतनयां चेंहि आहे.
 येथील बहुतेक उत्पादक भांडवल प्रतिवर्षी इंग्लंडास जाऊन येथील उद्योगधंदा नष्ट झाल्यामुळे येथील काम करणाऱ्या लोकसंख्येची कशी स्थिति झाली आहे, हें कोणास थोडक्यांत समजून घेण्याची इच्छा असेल तर त्यांनी पुढील आंकडे लक्ष लावून वाचावे. हिंदुस्थानांतील शंभर मनुष्यां- पैकी ८६ मनुष्यांचा संबंध शेतकीशी आहे; इंग्लंडांत १४ चा आहे. गिरण्या वगैरे कारखान्यांत हिंदुस्थानांतील लोकसंख्येपैकी शेकडा १२माणसें असतात; इंग्लंडांतील लोकांपैकीं अशाच कामाकडे शेकडा ३० असतात, आणि इतर सर्व प्रकारच्या उद्योगांमुळे इंग्लंडांत शेंकडा पंचावन्न इसमांस