या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संतति व संपत्ति

११


 जगांत प्रस्तुत काली जी विपत्ति दृष्टीस पडते तिचा तीन चतुर्थांश भाग फाजील प्रजोत्पादनापासून उत्पन्न होतो असें विचारांतीं खचित दिसून येईल. घराण्यांतील लहानसहान तंट्याबखेड्यांपासून तो राष्ट्राराष्ट्रांमधील मोठमोठ्या लढायांपर्यंत सर्व भांडणांचें आदिकरण संततीची अपरिमित वृद्धि होय. अन्तर्दृष्टि करून ज्यानें त्यानें आपल्यापासून विचार करण्यास आरंभ केला, व हळूहळू अधिकाधिक प्रदेशावर दृष्टि टाकली, तर त्याला असें दिसून येईल कीं, मनुष्यमात्राच्या अंगी कामवासना जितकी उत्कट आहे तितकी नसती, तर त्यास जीं दुःखें आणि ज्या यातना भोगाव्या लागत आहेत त्यांपैकीं पुष्कळ टळल्या असत्या. पदार्थविज्ञानादि अनेक उपयुक्त शास्त्रांचा प्रसार होण्यास प्रजोत्पादन हेंच कारण होय, प्रजोत्पादनापासून मनुष्य जातीचें मुळींच हित झालें नाहीं असें आमचें म्हणणें नाहीं. आमचें इतकेंच म्हणणें आहे की फाजील प्रजोत्पादनानें हितापेक्षां अहित फार झालें आहे व थोड्यार वर्षांत या विपदुगमाकडे पृथ्वीवरील सुधारलेल्या हरएक राष्ट्रांतील विचार- शील, शास्त्रनिपुण, आणि सानुकंप पुरुषांचे डोळे न लागतील, तर उपयुक्त शास्त्रविद्यांच्या प्रसारापासून विशेष फायदा न होतां मनुष्यजातीची स्थिति उत्तरोत्तर शोचनीय होत जाईल, यांत संशय नाहीं. आर्य लोकांची फाटाफूट होऊन त्यांच्या शाखा युरोप आणि आशियाखंडांत पसरल्या, व त्यांपैकीं एक हिंदुस्थानांत येऊन आधुनिक भारतीय प्रजेचें पूर्वजत्व आपणाकडे घेती झाली, याचें कारण काय तर वाढलेल्या प्रजेचें पोट भरण्याची आवश्यकता. ग्रीक लोकांनी इराणवर स्वाऱ्या केल्या, एशिया मायनरमध्ये वसाहती केल्या व सिंधुनदीपर्यंत आपल्या वर्षाचा आणि पराक्रमाचा दर्प आणून भिडविला याचें कारण तरी प्रजावृद्धिच होय. पुढें रोमची पादशाही प्रबल होऊन तिने इजिस, ग्रीस, फ्रान्स, जर्मनी व इंग्लंड वगैरे देशांस जिंकून जिकडे तिकडे रोमन अंमल चालू केला, यालाही प्रजावृद्धीहून दुसरें कारण नाहीं. या इतलीच्या अवाढव्य वैभवास धक्का बसण्यास व अखेरीस त्याचा चुराडा