या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०७ कै. विष्णु कृष्ण चिपळोणकर झाल्यावर त्यांस लागू पडता म्हणजे आम्हांस इतका खेद करण्यास जागा उरती ना. परन्तु_ज्याप्रमाणे_एखादा_प्रचंड वृक्ष फळास येतो आहे नाहीं तों विद्युत् मे-जमीनदोस्त_ व्हावा, त्याप्रमाणे आतां आतां कोठे शास्रीबोवांच्या बुद्धीचीं परिपक्व फलें हवीं तशीं लोकांस मिळू लागलीं होतीं_तों त्यांस करुणाविमुख मृत्यूनें हरून नेलें हा केवढा جستجربع ساعت تجعین حات= خ******** दुःखाचा प्रसंग !_गेल्या वर्षीच आम्हीं एकत्र होऊन एकदिलानें प्रस्तुत उद्योग आरंभिला तेव्हांची वीरश्री कोणीकडे आणि केसरीराजाच्या नैसर्गिक उद्धत वृत्तीला अननुरूप अशी सांप्रतची खिन्नावस्था कोणीकडे ? असो, धैर्थ धरून आली दिवस कसा तरी घालावलाच पाहिजे. विष्णुशास्री हे प्रसिद्ध कृष्णशास्री यांचे चिरंजीव. यांचे जन्म १८५० त झाले. यांना लहानपणापासून वाचण्याचा जबरदस्त नाद असे. ज्याप्रमाणे डेॉक्टर जान्सन बापाच्या दुकानावर बसून फावल्यावेळीं अनेक विषयांवरील व्हाल्मेंच्या व्हाल्में फडशा करी, त्याप्रमाणे * दक्षिणाप्रैज कमिटी ? किंवा * नेटिव प्रेसचे रिपोर्टर?या नात्यानें कृष्णशास्त्र्यांकड़े जी पुस्तकें येत तीं हे भावी शास्री वाचून टाकीत. या रीतीनें मॅट्क्युिलेशन होण्यापूर्वीच विष्णुपंतांच्या नजरेखालून अनेक ग्रंथ जाऊन मराठी भाषेवर त्यांचे प्रेम जडलें, व तें उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेलें. १८६५ त विष्णुशास्री यांची पहिली परीक्षा होऊन ते कॉलेजांत गेले. त्यांना गणिताचा मोठा कंटाळा असे. मेकालेप्रमाणे ते आपला सारा वेळ ऐतिहासिक ग्रंथ वाचण्यांत घालवीत. १८७२ त त्यांची बी. ए. ची परीक्षा पास झाली. १८७३ त कांहीं महिन बाबा गोखले यांच्या शाळेत शिक्षकाचें काम केल्यानंतर येथील सरकारी हायस्कुलांत त्यांना नव्वदांची जागा मिळाली, व पुढे नव्वदांचे शंभर झाले. निबंधमालेचा पहिला अंक १८७४ त बाहेर आला. निबंधमाला जों जों मोठी होऊं लागली तों तों शास्त्रीबोवांचीं मतें बाहेर पडून स्वातंत्र्यशत्रु आणि स्तुतिप्रिय अशा अधिकाच्यांशीं त्यांचे तेढे पडू लागलें. आपल्या कर्तव्यांत निरंतर तत्पर असल्यामुळे शास्रीबोवा कधीं कोणाची पर्वा ठेवीत नसत. याचा परिणाम असा झाला कीं, जात्या परप्रतिष्ठाअसहिष्णु असे आमचे डायरेक्टर चाटफील्ड साहेब यांच्या तापट प्रकृतीवर कित्येक निंदकांनीं तैलवृष्टि केल्यामुळे तिनें जो पेट घेतला त्यासरशी त्यांनीं शास्री